हिवाळ्यात 'या' पद्धतीने वॉक केल्यास शरीराला मिळतील फायदे ! पाहा!
वंदना वेदपाठक : आपली तब्येत उत्तम राहण्यासाठी चालणं हा सर्वात उत्तम व्यायाम मानला जातो.निरोगी राहण्यासाठी वॉक करणं फार महत्वाचं असतं. हेल्थ एक्सपर्ट्स हे दिवसातून कमीत कमी अर्धा तास चालण्याचा सल्ला देतात. वॉक केल्यानं फक्त शरीर निरोगी राहत नाही तर लठ्ठपणाही उद्भवत नाही आणि मेंदू फ्रेश राहतो.
चालणं तब्येतीसाठी चागलं असतं. डॉक्टर सांगतात की थंडीच्या वातावरणात चालल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.जे लोक थंडीच्या दिवसांत खूप कमी वॉक करतात त्यांच्या आरोग्याला धोका असतो.
थंडीच्या दिवसांत वॉक केल्यानं शरीरातील रक्त संचारण संथ होते. याशिवाय प्रदूषण जास्त असल्यामुळे हृदयाच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. बीपी वाढल्यास हृदयाच्या आजारांचा धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत थंडीच्या दिवसांतच चार किंवा पाच वाजता उठून वॉक करू नये.
उन्हाळ्याच्या दिवसात चार पाच वाजता वॉक करणं उत्तम ठरतं. हिवाळ्याच्या दिवसांत वॉक करण्याची योग्य वेळ ही शक्यतो सकाळी 6 ते 7 च्या नंतरच असावी .हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की वॉक केल्यानं शरीराला आवश्यक व्हिटामीन डी मिळते. या वेळी ऊन निघाल्यास हाय बी.पी चा धोका नसतो. प्रदूषणाचा स्तर कमी होतो.
सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान वॉक करणं फायदेशीर ठरतं. वॉक केल्यानं शरीराला व्हिटामीन डी मिळते. या वेळी ऊन निघाल्यास हाय बीपीचा धोका नसतो. प्रदूषणाचा स्तरही कमी असतो. म्हणून याच वेळी वॉक करायला हवं.किती वेळ वॉक केल्यानं शरीर फिट राहतं.
Sakhi
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की कमीत कमी अर्धा तास वॉक करायला हवं. निरोगी राहण्यासाठी जवळपास ४५ मिनिटं वॉक करायला हवं. एका व्यक्तीनं निरोगी राहण्यासाठी कमीत कमी १० हजार पाऊलं चालायला हवं. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. एक्स्ट्रा फॅट वाढत नाही.
डॉक्टर सांगतात की वॉक करण्याआधी थोडावेळा वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करा. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळेल. जर तुम्ही हिवाळ्यात वॉक करत असाल तर काहीवेळ ऊन्हात फिरा. यामुळे शरीरात उष्णता तयार होईल. या काही टिप्सचा वापर करून जर वॉकिंग केली तर ती फायदेशीर ठरते.
(सूचना- वरील माहिती ही इंटरनेट स्त्रोताच्या आधारे घेतली गेली आहे. वापरापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.)