देशमुख हत्याकांड प्रकरण; धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणे अयोग्य; भुजबळांनी केली पाठराखण

मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा

On
देशमुख हत्याकांड प्रकरण; धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणे अयोग्य; भुजबळांनी केली पाठराखण

Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : राज्यातील ओबीसी नेते तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बीडच्या मस्साजोग हत्याकांड प्रकरणी अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांची जोरदार पाठराखण केली आहे.

छगन भुजबळ यांचा राजीनामा मागणे पूर्णतः अयोग्य आहे. मला मंत्री व्हायचे आहे म्हणून कुणाचा बळी द्यावा असे माझ्या मनातही येणे शक्य नाही, असे ते म्हणालेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाप्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. या हत्याकांडात त्यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी सोमवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत मुंडे यांची पाठराखण केली आहे.

तपास पूर्ण होण्यापूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का?

छगन भुजबळ म्हणाले की, मला मंत्री व्हायचे आहे म्हणून कुणाचा बळी द्यावा असे माझ्या मनातही येणे शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच संतोष देशमुख हत्याकांडावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे या घटनेचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागितला जात आहे?

या प्रकरणात कुणाचा हात असल्याचे स्पष्ट होईपर्यंत राजीनामा घेणे योग्य नाही. तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यानंतर माझा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे माझे उपमुख्यमंत्रीपद गेले. परंतु त्यानंतर झालेल्या सीबीआय चौकशीत माझे नावही आले नाही, असेही छगन भुजबळ यावेळी या प्रकरणी स्वतःचे उदाहरण देताना म्हणाले.

Sakhi

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाली. सुरेश धस यांनी या हत्येचे क्रौर्य सांगितले. ते ऐकतानाही अंगावर काटा आला. त्यामुळे या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत वाईट पद्धतीने झाली. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, पण कायदा सांगतो त्याप्रमाणे जो निरपराध अपराध्याला शिक्षा होता कामा नये. मी कुणाची बाजू घेतो आहे असे अजिबात नाही. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा

छगन भुजबळ यांनी यावेळी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा देणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. इथे ठोकशाही नव्हे तर लोकशाही आहे. जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी स्वतः मुंडे चार-पाच वेळा गेले होते. ते एकमेकांना चांगले ओळखतात, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे छगन भुजबळ यांनी यावेळी आपण मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज नसल्याचा पुनरुच्चारही केला. माझी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. आमची नायगाव येथे भेट झाली होती. त्यावेळी माझी त्यांच्याशी नायगाव येथील विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली, असे ते म्हणाले.

अजित पवारांनी तसे बोलणे गरजेचे नव्हते

छगन भुजबळांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मतदारांविषयी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली. अजित पवारांनी मतदारांविषयी असे बोलायला नको होते. कारण, लोक, मतदार या देशाचे मालक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो अधिकार दिला आहे. बाकी मी याविषयी काहीही बोलणार नाही, असे ते म्हणाले. भुजबळांनी यावेळी मतदारांना वेश्या म्हणून उल्लेख करणाऱ्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना समज देण्याचीही गरज व्यक्त केली. 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!