'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
वंदना वेदपाठक : थंडीच्या दिवसात गरमागरम चहा पिणे कोणाला नाही आवडणार?? सर्वांनाच सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप हातात लागतोच! परंतु एक असा चहा आहे. जो आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवेल, आणि ज्याच्या सेवनाने केवळ आपली सकाळच चांगली होणार नाही, तर त्याच्या सेवनाने कर्करोगासारखे अनेक गंभीर आजारही टाळू शकतो.
हा चहा म्हणजे लवंग चहा. ज्याचे इतके फायदे आहेत की, त्याचे नियमित सेवन आपल्याला अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून वाचवू शकते. श्वसन रोग, पचनक्रिया इत्यादी अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते उपयुक्त ठरू शकते. आयुर्वेद तज्ञ डॉ. रस बिहारी तिवारी यांच्या मते लवंग चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत आणि ते पिऊन लोक अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून दूर राहू शकतात.
काय आहेत या चहाचे फायदे ते पहा
डॉ. रस बिहारी तिवारी सांगतात की, "लवंग चहा पचन सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत काम करतो. त्यात 'युजेनॉल' नावाचे एक तत्त्व आढळते जे अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी परिपूर्ण आहे." "लवंग चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा म्हणून काम करतो आणि त्याचे नियमित सेवन तुम्हाला ब्लड शुगरपासूनही वाचवू शकते. याचे नियमित सेवन केले तर अपचन, ॲसिडिटी, पोटदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. ते पचनशक्ती मजबूत करते आणि गॅसची समस्या दूर करते. तसेच, लवंग चहाच्या वापराने दमा, ब्राँकायटिस आणि सर्दी-खोकला यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो", असेही ते सांगतात.
तसेच आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले की, "लवंग चहा कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्येही खूप प्रभावी आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ते विशेषतः फुफ्फुस, स्तन आणि पोटाच्या कर्करोगामध्ये उपयुक्त मानले जाते. परंतु लवंग चहाचा वापर अत्यंत मर्यादित पद्धतीनेच केला पाहिजे कारण लवंग ही खूप उष्ण असते. त्यामुळे लोकांनी त्याचा अतिरेक वापर करणे टाळावे, जेणेकरून इतर समस्या उद्भवणार नाहीत.
(टीप:- वरील माहिती ही आयुर्वेदिक माहितीच्या स्तोत्रांमधून घेण्यात आलेली आहे तरी वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.)