'फुलवंती' प्राजक्ता माळीचे चाहत्यांना न्यू इयर सरप्राईज गिफ्ट!
Phulvanti Prajakta Mali New Year surprise gift for fans : मराठी मनोरंजन विश्वातील ताकदीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहिले जाते. तिच्या नुकत्याच आलेल्या 'फुलवंती' चित्रपटाची ही सगळीकडे खूप चर्चा झाली. तिने साकारलेलं फुलवंती हे पात्र सर्वांच्याच पसंतीस उतरले . प्राजक्ताने आता तिच्या चाहत्यांसाठी एक न्यू इयर गिफ्ट आणलं आहे आणि ते म्हणजे तिचा नवीन चित्रपट 'चिकी चिकी बूबूम बूम'!
मराठी अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही प्रसिद्ध कलाकार मंडळी 'चिकी चिकी बुबूम बुम' या चित्रपटाद्वारे आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे नुकतेच एक गमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले असून यामध्ये स्वप्नील जोशीचा हटके लूक दिसत आहे.
तर बाकीचे कलाकार घाबरलेल्या आणि गोंधळलेले दिसतायेत. चित्रपटाचे कथानक काय आहे हे लवकरच आपल्याला समजेल. चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज आणि धमाल मनोरंजनाची खात्री देणारा 'चिकी चिकी बुबूम बुम' हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.
'चिकी चिकी बुबूम बुम' या चित्रपटाची कथा अजून कळलेली नसली तरी, या चित्रपटातील मोठ्या कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे फवारे उडतील हे नक्की. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांनी केले आहे.
Sakhi
'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.स्वप्नील जोशीने नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
या पोस्टरमध्ये प्राजक्ता माळी घाबरलेली दिसत आहे. तसेच इतर कलाकार देखील या पोस्टरमध्ये दिसत आहेत. त्यासोबतच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हातात बॉटल आणि काळ्या रंगाचा गॉगल लावून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात देखील दिसत आहे. तसेच याच कार्यक्रमातील काही कलाकार देखील पोस्टर मध्ये दिसून येत आहेत.
स्वप्नील जोशीने हे पोस्टर शेअर करताना त्याला खास कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, "तुमच्या 31st च्या पार्टीत 'चिकी चिकी बुबूम बूम' चित्रपटाची release date सांगतोय. तारीख लक्षात ठेवा. 28 फेब्रुवारी 2025 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 'चिकी चिकी बुबूम बूम' बघा आणि मग हसायचं थांबवणं तुमच्या हातात नाही." त्याच्या या कॅप्शन ने चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.