सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अपडेट; सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी

हत्येनंतर 25 दिवसांनी आरोपी अटकेत, बीड पोलिसांनी पुण्यातून उचलले आरोपींना

On
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अपडेट; सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची CID कोठडी

Santosh Deshmukh Murder Case Update : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.  या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. 

मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पंचवीस दिवसानंतर, तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे.  

संतोष देशमुखांचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला अटक

आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याच चौकशीत या आरोपींचा ठावठिकाणा कळाल्याचं सांगण्यात येतंय. या दोन मुख्य आरोपींसह, हत्येच्या दिवशी सरपंचाचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे. सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता. याशिवाय अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता.

Sakhi

आरोपी कसे जाळ्यात अडकले?

या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जाण्यासाठी मदत केली, ज्यांच्या संपर्कात हे तीनही लोक होते त्यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर संतोष देशमुखांचा ठावठिकाणा सांगणारा तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आलं.  

मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ते ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली. या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते. नवीन सिम कार्ड घेतले होते. पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे यांना अटक केली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!