'केजीएफ' फेम यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!
Poster of 'KGF' fame Yash's film 'Toxic' released : 'केजीएफ'या चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेला दाक्षिणात्य अभिनेता यश ने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फॅन्स साठी एक खास भेट दिली आहे .यशने सोशल मीडियावर 'टॉक्सिक' चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, त्यावर कॅप्शन लिहिले, 'त्याला आझाद करायचं आहे'. या पोस्टरमध्ये यश सूट आणि टोपी घालून, एक कारच्या जवळ सिगारेट ओढताना दिसत आहे. पोस्टरवर लिहिलं आहे, 'त्याची अनुपस्थिती तुझ्या अस्तित्वाचं संकट आहे', या कॅप्शन ने चाहत्यांमधील उत्सुकता अजूनच वाढली आहे.
या पोस्टच्या माध्यमातून यशने 8 जानेवारीला 'टॉक्सिक' चित्रपटाच्या माहितीची घोषणा केली आहे. याशिवाय त्याने पोस्टच्या वर '10.25 AM' या वेळेचा उल्लेख केला आहे, त्यामुळे असे वाटते आहे की की यश त्याच्या चित्रपटातील लूक, स्टोरीलाइन किंवा इतर महत्त्वाचे अपडेट्स शेअर करेल.
'टॉक्सिक' हा चित्रपट यशच्या चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल अनेक अफवा झाल्या आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच, चित्रपटाची रिलीज डेट एप्रिल 2023 मध्ये निश्चित केली होती, परंतु नंतर काही कारणास्तव त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. यशच्या चाहत्यांनी या चित्रपटावर आपले प्रेम आणि उत्साह व्यक्त केले आहे आणि आता त्यांना फिल्मचे अधिक अपडेट्स मिळण्याची प्रतीक्षा आहे.
'टॉक्सिक' चित्रपटाबद्दल एक मुख्य प्रश्न चाहत्यांना आहे. या चित्रपटात कोणता कलाकार यशसोबत मुख्य भूमिकेत आहे? काही बातम्यांनुसार, यशसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी आणि नयनतारा काम करत आहेत. पण या नावांची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. यशच्या चाहत्यांनी या दोन्ही अभिनेत्रींना यशसोबत पडद्यावर पाहण्याची उत्साहाने वाट पाहात आहे.
यशच्या चाहत्यांनी त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर आनंद व्यक्त केला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या आनंदाची अभिव्यक्ती केली आहे, 'आता इतर सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले जातील' आणि 'आम्ही प्रतीक्षा करत आहोत' अशी प्रतिक्रियाही दिली आहे. यशच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी हे एक मोठं सरप्राईज ठरले आहे.त्याच्या आगामी चित्रपट 'टॉक्सिक'मधून तो एक नवा लूक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटावर सर्वांचेचं लक्ष आहे आणि यशसारख्या मोठ्या स्टारच्या कामगिरीची अपेक्षा अधिकच वाढली आहे.