माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट, 'या' महिलांना नाही मिळणार आता पैसे
मंत्री आदिती तटकरेंनी दिला इशारा; म्हणाल्या - काही तक्रारी आल्यानंतर घेतला मोठा निर्णय
Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojna मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं.
काही अर्जांबाबत आम्ही पडताळणीची करतोय प्रक्रिया
ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत, असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलं.
काही तक्रारीनंतर घेतला मोठा निर्णय
आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या. आधार कार्ड मिस मॅचच्या तक्रारी आल्या होत्या. ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत, असं देखील त्या म्हणाल्या.
शासन निर्णयात बदल होणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. काही महिलांकडून ऑनलाइन अर्ज आणि ऑफलाइन अर्ज आले होते. काही महिलांचं लग्नानंतर स्थलांतर देखील झालं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या.
Sakhi
आधार कार्ड अन् बॅकेतील नावात तफावत असल्यास अपात्र करणार
चारचाकी वाहनं ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल, असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या. आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार पात्र असणार नाहीत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
डिसेंबरची रक्कम 1500 रुपयांप्रमाणं 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9 हजार रुपये जमा झाले आहेत. डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. महायुतीनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणं राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.