चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
कोणत्या जिल्ह्यात निघला कागदी कप बंदीचा आदेश, सरकारच्या वतीने नेमका निर्णय काय?
कुठल्याही कार्यक्रमात किंवा चहाच्या दुकानात कागदी कप सर्रास दिले जात होते. परंतु, याच कागदी कपांवर आता बंदी घालण्याची निर्देश आले आहेत. आता हेच कागदी कप कालबाह्य होणार असल्याचं म्हटलं जात आहे. काचेच्या कपातच आता चहा मिळणार असून, कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
आरोग्य आणि पर्यावरण विभागामार्फत पेपर, प्लास्टिक कप बंदीबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती आबिटकरांनी दिली. या कपांवर आधीपासूनच बंदी आहे. मात्र कोणी जर त्याचा वापर करत असेल आरोग्य, पर्यावरण विभाग त्याबाबत जनजागृती करेल असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
या जिल्ह्यात कागदी कपांवर बंदीचे निर्देश लागू
कागदी कप वापरास सोपे आणि ते स्वच्छ करण्यास लागणारी मेहनत कमी, तसेच ते वापरून टाकून देण्यासारखे असल्यामुळं इथं स्वच्छतेचा मुद्दाच येत नव्हता. त्यामुळेच अनेकांनीच या कागदी कपांना प्राधान्य दिलं होतं. पण, हे कप आरोग्यास घातक असल्यानं बुलडाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून या कपांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहे.