व्ही. नारायणन यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती; रॉकेट अन् स्पेसक्राफ्ट यंत्रणेत एक्सपर्ट

अनेक पुरस्कारांनी सन्मानित; एस. सोमनाथ यांची घेणार 14 जानेवारीला जागा

On
व्ही. नारायणन यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती; रॉकेट अन् स्पेसक्राफ्ट यंत्रणेत एक्सपर्ट

V Narayanan new ISRO chairman : केंद्र सरकारने मंगळवारी अवकाश शास्त्रज्ञ व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांना अंतराळ विभागाचे सचिवही करण्यात आले आहे. 14 जानेवारी रोजी त्यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांची जागा घेणार आहेत. 

नारायणन यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. सध्या ते वालियामाला येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे (LPSC) संचालक आहेत. नारायणन यांना 40 वर्षांचा अनुभव आहे. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशनमध्ये ते तज्ञ आहेत.

एस. सोमनाथ यांची 14 जानेवारीला सेवानिवृत्ती

इस्रोचे विद्यमान अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी 14 जानेवारी 2022 रोजी इस्रोचे अध्यक्षपद स्वीकारले. ३ वर्षांच्या कार्यकाळानंतर ते निवृत्त होत आहेत. इस्रोने त्यांच्या कार्यकाळात इतिहास रचला. इस्रोने चंद्रयान-3 केवळ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले नाही तर पृथ्वीपासून १५ लाख किमी वर असलेल्या लॅग्रेंज पॉइंटवर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-एल१ पाठवले.

त्यांनी GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचं प्रकल्प संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली C25 स्टेज यशस्वीपणे विकसित केलं गेलं. या बरोबरच डॉ.व्ही.नारायणन यांनी आदित्य अंतराळयान आणि GSLV Mk-III मिशन्स आणि चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ च्या मोहिमेमध्ये देखील त्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय असून त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता इस्रोला पुढे जाण्यास महत्वाची ठरणार आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

डॉ. व्ही. नारायणन यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना आयआयटी खरगपूरकडून रौप्य तर ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने (ASI) त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवलेलं आहे. तसेच एनडीआरएफकडून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!