आशा भोसले यांनी गायलं 2024 मधील ट्रेंडिंग गाणं 'गुलाबी साडी'!!
मेलडी क्वीन आशा भोसले यांच्या धुंद आवाजाचे प्रत्येक जण चाहते आहेतच परंतु त्यांचा तरुणाईला लाजवेल असा उत्साह ही प्रत्येक कार्यक्रमात पाहायला मिळतोच. नुकताच त्यांचा दुबई मध्ये एक शो झाला. या शो मध्ये त्यांनी 2024 मधलं सर्वात ट्रेनिंग गाणं 'गुलाबी साडी' गायलं.
आशा भोसले यांनाही पडली संजू राठोडच्या या सुपरहिट गाण्याची भुरळ
मेलडी क्वीन आशा भोसले यांच्या नावावर गाण्यांचे अनेक विक्रम आहेत. आज वयाच्या 91 व्या वर्षी देखील त्या स्टेजवर लाईव्ह गाताना ऐकून त्यांचे चाहते भारावतात. असाच एक अनुभव काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये आला आहे. आशा भोसले यांनी दुबई मधील त्यांच्या लाईव्ह शो मध्ये अनेक ट्रेडिंग गाणी गायली. यामध्ये संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' चा देखील समावेश आहे. संजूच्या 'गुलाबी साडी' गाण्याची भूरळ अनेकांना पडलेली आहे.
चाहत्यांना मिळाली दुर्मिळ संधी
मात्र दुबईत स्टेज वर आशा भोसले यांच्या अंदाजातही हे गाणं ऐकण्याची दुर्मिळ संधी त्यांच्या चाहत्यांना मिळाली आहे. सध्या आशा भोसले यांच्या दुबईच्या लाईव्ह शो मधील क्लिप्स वायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा विकी कौशलच्या अंदाजातील 'तौबा तौबा' परफॉर्मन्स देखील तुफान वायरल झाला होता.गुलाबी साडी' गाताना त्या खास गुलाबी रंगाच्या साडीत होत्या. या गाण्याच्या काही हुक स्टेप्स देखील करत त्यांनी हे गाणं लाईव्ह परफॉर्म केले आहे.
Sakhi
2024मध्ये सर्वाधिक ट्रेडिंग गाणं राहिले गुलाबी साडी
गुलाबी साडी हे गाणं 10 महिन्यांपूर्वी युट्युब वर लॉन्च करण्यात आलं आहे. या गाण्याला 300 मिलियन पेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. संजू राठोड हा या गाण्याचा गायक आहे. 2024 मधील ट्रेंडिंग गाण्यांपैकी हे एक गाणं होतं. तसेच आशा भोसलेंनी विकी कौशल च्या सुपरहिट'तौबा तौबा' गाण्यावरील हूक स्टेपही केले. त्यांचा असा उत्साह पाहून रसिकांनी कौतुक केलेच आहे पण त्यासोबत बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने देखील सोशल मिडीयावर त्यांचा व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला होता. त्यांचा प्रफुल्ल उत्साह हा त्यांच्या प्रत्येक गाण्यातून दिसून येतोच!