महाकुंभमेळा 2025 ची सुरुवात कधी पासून होणार, प्रयागराज प्रशासनाकडून कशी झाली तयारी
किती कोटी भाविक येण्याची शक्यता, जगभरातील साधु-महंत होणार सहभागी, जाणून घ्या संपूर्ण स्टोरी अन् VIDEO
Prayagraj Maha kumbh Mela 2025: उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभ मेळ्याची जोरदार तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी असा 44 दिवस महा कुंभ मेळा चालणार आहे. चला तर जाणून घेऊया कुंभमेळ्याविषयी सविस्तर. कुंभमेळा कधी सुरू होणार, किती दिवस चालणार, शाहीस्नान कधी आहेत. प्रशासनाकडून काय झाली तयारी, वाचा सविस्तर.
तब्बल १२ वर्षांनी एकदा होणाऱ्या या महा कुंभ मेळ्याची फक्त भारतातीलच नव्हे, तर विदेशातीलही भाविक मोठ्या आतुरतेनं वाट पाहात असतात. कोट्यवधी भाविक या कुंभ मेळ्याला हजेरी लावत असतात. 12 वर्षांपूर्वी झालेल्या मेळाव्याला काही कोटी भाविकांनी हजेरी लावली होती.
महाकुम्भ में ज़ोर-शोर से चल रही तैयारियों की बेहतरीन झलकियों का अनुभव अब आपके सामने#MahaKumbh2025 | #Mahakumbh | @MahaaKumbh | @MahaKumbh_2025 | @CMOfficeUP | @myogiadityanath | @DDNewslive | @MIB_India pic.twitter.com/NgjzWuF4M9
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) January 7, 2025
यावेळीही ही संख्या तब्बल 40 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या काळात सुरक्षा व्यवस्थेसाठीही चोख बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत.
अघोरियों के विहंगम दृश्य ✨🔱 pic.twitter.com/mVB3Gm4UNB
— MahaKumbh 2025 (@MahaaKumbh) January 7, 2025
कधी होणार महा कुंभ मेळा?
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा ४४ दिवस महा कुंभ मेळा चालणार आहे. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला महा कुंभ मेळा जिल्हा जवळपास ६ हजार हेक्टर परिसरामध्ये उभारण्यात येत आहे. त्यातील ४ हजार हेक्टरमध्ये प्रत्यक्ष कुंभ मेळ्याचं आयोजन होईल, तर १९०० हेक्टर परिसरामध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली गेलेली आहे.
श्री तपोनिधि आनंद अखाड़े के साधु-संतों एवं नागा संन्यासियों ने भव्य वैभव के साथ यात्रा निकाल कर धर्म ध्वजा फहराते हुए महाकुम्भ में किया छावनी प्रवेश।
— MahaKumbh 2025 (@MahaaKumbh) January 6, 2025
नगाड़ों की ध्वनि और हर-हर महादेव के जयघोष से वातावरण हुआ भक्तिमय। pic.twitter.com/LP5SWgrTQC
सुरक्षेची चोख उपाययोजना
महा कुंभ मेळा म्हणजे शाही स्नान हे समीकरण भाविकांसाठी ठरलेलंच आहे. शाही स्नानाला मोठं महत्त्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या काळात गंगा नदीवर लाखोंच्या संख्येनं भाविक शाही स्नान करतात. अशावेळी कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांसोबतच अंडरवॉटर ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हे ड्रोन ३०० मीटरपर्यंतच्या खोलीवरचा माग काढू शकतात.
शाही स्नानाच्या काय आहेत तारखा?
प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महा कुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या तारखांवेळी जास्त गर्दी होणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
1) 13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा
2) 14 जानेवारी 2025 – मकर संक्रात
3) 29 जानेवारी 2025 – मौनी अमावस्या (सोमवती)
4) 3 फेब्रुवारी 2025 – वसंत पंचमी
5) 12 फेब्रुवारी 2025 – माघी पौर्णिमा
6) 26 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्र