देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; नाना पटोलेंचाही घेतला समाचार
Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना केंद्रातील नेत्यांचा पाठिंबा आहे. प्रस्थापितांच्या बुडाला जाळ लावण्याचे काम देवा भाऊ यांनी केले आहे, असे म्हणत सदभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
RCC New
महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले
सदाभाऊ खोत म्हणाले, मराठा समाजाला सर्वात जास्त कोणी दिले असेल तर ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले असेल. मराठा समाजासाठी जे जे करता येईल ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात तशा छत्र्या आंदोलनाच्या येतात. तसेच महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले आहे, असे म्हणत शरद पवारांवर खोचक शब्दात टीका केली आहे.
सदभाऊ खोत यांची नाना पटोलेंवर टीका
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करताना सदभाऊ खोत म्हणाले, तंत्रज्ञान यायची सुरुवात झाली ती राजीव गांधी यांच्या काळामध्ये. ईव्हीएम हे सुद्धा काँग्रेसने आणले होते. आता तेच तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत. तुम्हाला पुढची पिढी अडाणी ठेवायची आहे का? तुम्ही जिंकला की तुम्हाला चांगले वाटते आणि हरला की तुम्ही ईव्हीएमला दोष देतात.
पुढे बोलताना सदभाऊ खोत म्हणाले, या मशीनला बोलता येत नाही, चालता येत नाही म्हणून तुम्ही त्याला दोष देतात. महाविकास आघाडी ही सरदारांची आघाडी, जे सर्व्हे केलेत ते रस्त्यावरती लोकांचे सर्व्हे केले. मात्र घरातल्या माय माऊलींचा सर्व्हे केला नाही. कारण ते घरात जेवत नाहीत, बाहेर जेवतात, असा टोला सदभाऊ खोत यांनी नाना पटोले यानं लगावला आहे.
Sakhi
बाबा आढाव यांनी या वयात आंदोलन करणे योग्य नाही
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव ईव्हीएमच्या विरोधात तीन दिवसीय उपोषण करणार आहेत. यावर सदाभाऊ खोत म्हणाले, बाबा आढाव यांनी या वयात आंदोलन करणे योग्य नाही आणि ते आंदोलन कोणासाठी करत आहेत, ज्यांनी महाराष्ट्र लुटला, देशाची राख रांगोळी यांनी केली, त्यांनी पिण्याचे पाणी दिले नाही, शेतीसाठी पाणी दिले नाही, त्यांच्यासाठी त्यांनी आंदोलन करू नये, असा सल्ला खोत यांनी दिला आहे.