जनतेनेच सांगितले ; खरी शिवसेना कोणाची ? ; बहुसंख्य ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांचा विजय

On
जनतेनेच सांगितले ; खरी शिवसेना कोणाची ? ; बहुसंख्य ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांचा विजय

2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि बंड केले. 40 आमदार आणि आठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद देखील मिळवले. शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना विविध न्यायिक व्यासपीठावर देण्यात आले. माझा पक्ष चोरला, माझे चिन्ह चोरले, माझा बाप चोरला, आता फैसला जनतेच्या कोर्टातच होईल, असे उद्धव ठाकरे त्यानंतर म्हणू लागले. जनतेच्या न्यायालयात आधी लोकसभेला पुसटसे संकेत मिळाले होते विधानसभा निवडणुकीत मात्र खरी शिवसेना कोणाची याचा फैसलाच जनतेने केल्याचे दिसून आले आहे.

RCC New

RCC New
 

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल 51 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला यातील बहुसंख्य ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. कोकणपट्ट्यात उद्धव ठाकरे गटाचा पुरता सफाया झाला. सावंतवाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे दीपक केसरकर, कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे, राजापूर विधानसभा मतदारसंघात किरण सामंत, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत, खेड दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम विजयी झाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे फक्त भास्कर जाधव तेवढे निवडून येऊ शकले. एकेकाळी या दोन्ही जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेला मिळत होत्या,

 रायगड जिल्ह्यात देखील उद्धव ठाकरे गटाला चांगलाच दणका मिळाला. महाड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भरत गोगावले यांनी विजय मिळवला. कर्जत मध्ये महेंद्र थोरवी विजयी झाले. 

ठाणे जिल्ह्यात तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचा सुपडा साफ करून टाकला. कल्याण पश्चिम मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे विश्व भोईर,  भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे,कल्याण ग्रामीण मध्ये राजेश मोरे, ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात प्रताप सरनाईक, कोपरी विधानसभा मतदारसंघात स्वतः एकनाथ शिंदे विजयी झाले, मराठवाड्यात देखील एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील शिवसेनेचा बोलबाला राहिला छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि छत्रपती संभाजी नगर मध्य या दोन्ही मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे उमेदवार विजयी झाले.

सिल्लोड मतदारसंघ अब्दुल सत्तार यांनी, पैठण विधानसभा मतदारसंघ विलास भुमरे यांनी, कन्नड विधानसभा मतदारसंघ संजना जाधव यांनी, वैजापूर रमेश बोरनारे यांनी, चोपडा चंद्रकांत सोनवणे, नांदगाव सुहास कांदे, मालेगाव बाह्य दादा भुसे, राधानगरी प्रकाश आंबेडकर, बुलढाणा संजय गायकवाड, रामटेक मध्ये आशिष जयस्वाल, पाटण मध्ये शंभूराज देसाई आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघात किशोर पाटील यांनी विजय मिळवला. नेवासा विधानसभा मतदारसंघ देखील एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने जिंकला. धाराशिव आणि उमरगा तसेच दर्यापूर या मतदारसंघात मात्र उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला.

Advertisement

Latest News

धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय
Maharashtra Assembly Election 2024 राज्यातल्या  विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. राज्यात महाविकासाघाडीला मोठा झटका बसला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा...
जनतेनेच सांगितले ; खरी शिवसेना कोणाची ? ; बहुसंख्य ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांचा विजय
आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा विजय
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार : भाजपच्या यशामुळे फडणवीस यांचा दावा भक्कम
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांचा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठी आघाडी
शरद पवार, उद्धव ठाकरेंची दक्षता; संभाव्य फूट अन् ​​​​​​​दगाफटक्याची भीती उचलले मोठे पाऊल