निवडणुकीचा निकाल लागताच प्रकाश आंबेडकरांचं ठरलं! कोणाला देणार पाठिंबा!
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झालीय. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या निकालाकडे. एक्झिट पोल्सचे अंदाज, ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका आणि सत्तास्थापनेवर होणाऱ्या राजकीय हालचाली यावर देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचा अर्थात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला तर ते कुणाला पाठिंबा देतील. याविषयी जाणून घ्या. याबाबत वंचितने कोणता निर्णय घेतला याची माहिती समोर आली आहे.
RCC New
निवडणुकीचा आढावा
यंदा महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे, जे गेल्या 30 वर्षांतील सर्वाधिक आहे. ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उद्या म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
एक्झिट पोल्सचे अंदाज
जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. महायुतीला आघाडी मिळेल असा अंदाज आहे, पण अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यामुळे सत्तास्थापनेसाठी राजकीय जुळवाजुळीची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर आणि राजकीय भूमिका
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'जो कोणी सरकार बनवू शकतो त्याला आम्ही पाठिंबा देऊ.' याशिवाय, 'आम्ही सत्ता निवडू, सत्तेत राहायला निवडू' असंही ते म्हणाले आहेत."
राजकीय खिचडीची शक्यता
राज्यात सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने राजकीय खिचडी शिजण्याची शक्यता आहे. प्रादेशिक पक्ष, अपक्ष आणि लहान पक्ष यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय, महाविकास आघाडी, महायुती, आणि इतर पक्षांमध्ये राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.