बहुचर्चित 'पुष्पा-2'चे नवीन गाणं 'Kissik' रिलीज झाले 

अल्लू अर्जून-श्रीलीला जोडीने सोशल मिडियावर घातला धूमाकुळ 

On
बहुचर्चित 'पुष्पा-2'चे नवीन गाणं 'Kissik' रिलीज झाले 

पुष्पा -2 : द रुल' या चित्रपटाची चाहते आतुरनेने प्रतीक्षा करत आहेत. अशातच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं असून ते इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.   

RCC New

RCC New

Mythri Movie Makers ने चित्रपटातील 'Kissik' हे नवीन गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. प्रोमोपासून या गाण्याची वाट चाहत्यांकडून केली जात होती. आता अखेर हे गाणे रिलीज झाले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांची जोडी या गाण्यात दिसत आहे. या गाण्यात दोघांचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गाण्यात श्रीलीलाचे जबरदस्त आकर्षण, बोल्ड एनर्जी आणि सुंदर पण दमदार डान्स मूव्ह्स पाहायला मिळतात. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पराजच्या भूमिकेत आपली जबरदस्त ऊर्जा दाखवत आहे.

Sakhi


5 डिसेंबरला प्रदर्शित होणार चित्रपट 

5 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers आणि Sukumar Writings यांच्या बॅनरखाली झाली आहे, तर संगीत T-Series ने हाताळले आहे.

Tags:

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले