महाराष्ट्राच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव का झाला; जाणून घ्या पराभवामागील कारणं
पक्षातील विसंवाद, नेतृत्वावर नव्हता विश्वास, महाविकास आघाडीतही होती बिघाडी, वाचा
Maharashtra Assembly Election : 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सर्वात मोठा झटका बसला तो महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला.
लोकसभा निवडणुकीत तब्बल तेरा खासदार निवडून आणून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. अवघे 16 आमदार निवडून आणण्यात पक्षाला यश आले. अर्थात 50 आमदारांच्या आकड्यावरुन केवळ 16 आमदार निवडून आले. नेमका कॉंग्रेसचा एवढा पराभव का झाला. त्याचे विश्लेषण जाणून घेऊया.
RCC New
स्टार प्रचारक येऊनही अशी दुर्दशा का झाली?
या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1990 सालापासून अपराजित असलेले काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार बाळासाहेब थोरात, अमरावती जिल्ह्यातील वजनदार नेत्या यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. तर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोडक्यात बसवले आहेत. राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासारखे स्टार प्रचारक घेऊनही काँग्रेसची दुर्दशा झाली.
महाविकास कोणताही समन्वय नव्हता
निवडणुका जाहीर झाल्यापासून काँग्रेस आणि महाविकास आघाडीत कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. लोकसभेत 13 जागा निवडून आल्यामुळे पक्षाचे नेते हवेत होते. आपणच मोठा भाऊ आहोत या थाटात काँग्रेसने सहकारी पक्षांना कस्पटा समान वागवले. खुद्द काँग्रेस अंतर्गतच प्रचंड विसंवाद असल्याचे दिसून आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या जबाबदारीचे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. आपली सत्ता येणार या भ्रमात असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षम्य चुका करून ठेवल्या.आणि त्याचे परिणाम सर्वत्र दिसून आले.
ऐन मतदानाच्या दिवशी कॉंग्रेसचा धोका
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आला दिलेला पाठिंबा सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अचानक काढून घेतला. त्यामुळे महायुती बेबनाव असल्याचा संदेश संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. काँग्रेस एकदिलाने लढते आहे, असे कुठेही जाणवले नाही. पक्षाचा प्रत्येक नेता आपापल्या मतदारसंघात आपापली लढाई लढण्यात मश्गुल होता. संघटना किंवा पक्ष म्हणून आपल्याला लढायचे आहे, हे भानच कुणाला नव्हते. विकास आघाडी म्हणून जिंकून आणण्याची सर्वस्वी जबाबदारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच असल्याचा काँग्रेसचा पवित्रा होता.
तरुण फळीतील नेत्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही
अमित देशमुख, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, गोवाल पाडवी या तरुण नेत्यांनी पक्षासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील गट अलिप्त राहिला. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून झालेले राजकारण आणि उमेदवारांनी घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरली. तिथे उमेदवार मधुरिमा राजे, खासदार शाहू महाराज आणि स्थानिक नेते सतेज पाटील यांच्यातील विसंवाद जिल्हाभरात चर्चिला गेला. कोल्हापुरातील गोंधळाचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर झाले.