देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांसोबत रात्री उशीरा होणार बैठक

मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता; महाराष्ट्रात महायुतीची सत्ता

On
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांसोबत रात्री उशीरा होणार बैठक

Maharashtra Assembly Election : 2024 महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहेत. भाजपला बहुमत असल्याने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. रात्री साडे 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

RCC New

RCC New

सरकार स्थापनेसाठी महायुतीकडून हालचाली करण्यात येत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी दिल्ली रवाना झाले असून रात्री साडे 10 वाजता त्यांची अमित शहांसोबत बैठक होणार असल्याचे माहिती आहे. फडणवीसांपाठोपाठ अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाऊ शकतात. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री पदाबाबतचा फॉर्म्युला किंवा मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांना किती वर्षांसाठी मुख्यमंत्री पद द्यायचे तसेच अजित पवारांना द्यायचे की नाही, याबाबतची अंतिम चर्चा या बैठकीत होणार आहे. तसेच या बैठकीत राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाचा देखील निर्णय होणार असल्याची माहिती आहे. याबाबत आज निर्णय झाल्यास उद्या नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे.

Sakhi

MVA विरोधी पक्षनेत्याबाबात संयुक्त दावा करू शकते 

विधानसभा निवडणुकीत, कोणत्याही विरोधी पक्षाला सभागृहात विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक जागा मिळालेल्या नाहीत. नियमांनुसार, विधानसभेच्या किमान 10% जागा जिंकणाऱ्या विरोधी पक्षाला हे पद दिले जाते. अनेक पक्षांना यापेक्षा जास्त जागा मिळाल्या असतील तर सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या विरोधी पक्षाला हे पद दिले जाते. यावेळी तसे नाही, त्यामुळे MVA संयुक्त  विरोधी पक्ष पदावर दावा करू शकते, यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिले जाऊ शकते.

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले