नवरदेवाने नवरीला आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टरच आणलं, कुठ घडला प्रकार! 

ते म्हणतात ना, हौसेला कधीच मोल नाही, कुटुंबियांनी दिली नवरदेवाला साथ! 

On
नवरदेवाने नवरीला आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टरच आणलं, कुठ घडला प्रकार! 

The groom brought a helicopter for the bride : हौसेला मोल नसतं असं  म्हटलं जातं. त्याची प्रचिती जळगावात आल्याचं दिसून आलं. आपल्या लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं. मग काय आख्खं गाव नवरीला निरोप देण्यासाठी हेलिपॅडवर पोहचले. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील आहे. या एका लग्नाची गोड कहाणी सर्वांना दिलासा देणारी आहे. 

RCC New

RCC New

लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. आपल्या लग्नातील आठवणी अविस्मरणीय राहाव्यात यासाठी प्रत्येकजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. चाळीसगावमध्ये सध्या अशाच एका हटके लग्नाची चांगलीच चर्चा आहे.

नवरदेवाने नवरीला दिले सरप्राईज..! 

चाळीसगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी भिकन रामचंद्र परदेशी यांची नात प्रिया हिचा विवाह सोहळा सोमवारी चाळीसगाव येथील कोदगाव चौफुली येथे पार पडला. छत्रपती देविसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्यासोबत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या लग्नात नवरदेवाने आपल्या पत्नीला सरप्राइज देत संभाजीनगर येथील व्यावसायिक चक्क हेलिकॉप्टरने आपल्या नववधूला आपल्या घरी गंगापूर येथे घेऊन गेला.

Sakhi

गावात असा पहिल्यांदाच सोहळा रंगला! 

गावात प्रथमच असा एक अनोखा सोहळा पार पडला. यावेळी समस्त रांजणगावकर आपल्या गावाच्या मुलीला सोडवायला हेलिपॅडवर उपस्थित होते. या नवदाम्पत्याला त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्व रांजणगावकरांनी शुभेच्छा दिल्या. 

 

Tags:

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले