देवेंद्र फडणवीस हेच का होऊ शकतात मुख्यमंत्री, 5 प्रमुख कारणं कोणती? 

विधानसभा निवडणुकीत काय जादू चालली, वाऱ्याच्या विरुद्ध सत्ता का आली?, वाचा विश्लेषण

On
देवेंद्र फडणवीस हेच का होऊ शकतात मुख्यमंत्री, 5 प्रमुख कारणं कोणती? 

Why Devendra Fadnavis will become the Chief Minister, read the main 5 points : महाराष्ट्रातील भाजप प्रणित महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. यासंबंधी एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा सद्या सुरू आहे. पण अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे सध्या तरी भाजपचा मुख्यमंत्री करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही.

भाजपसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे सोपी गोष्ट नव्हती. आजवर त्यांचे ब्राह्मण असणे हे त्यांचे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होते. याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्येही त्यांच्याविषयी बरेच मतभेद होते. 

RCC New

RCC New

पण फडणवीस यांच्या काही मजबूत बाजू त्यांना मुख्यमंत्रीपदी न पाहणाऱ्यांवर भारी पडल्या. त्यामुळे भाजपपुढे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.  चला तर जाणून घ्या काय आहेत प्रमुख कारणं, ज्यामुळे आता फडणवीसच महाराष्ट्राचे  नायक ठरणार आहेत...! 

1) शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यात भूमिका 

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे चाणक्य म्हणून उदयास येत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी कथित गद्दारी करत मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला. त्यानंतर फडणवीस यांनी शरद पवारांसारख्या बलाढ्य राजकारण्याच्या जबड्यातून अजित पवारांसारख्या नेत्यांना खेचून आणले.

पण त्यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्यासोबत आणता आले नाही. त्यामुळे त्यांचा खेळ अवघ्या 80 तासांतच संपला. देवेंद्र फडणवीस यांचे हे पहाटेचे औटघटकेचे सरकार पडले. पण फडणवीस यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. त्यामुळे भाजपला त्यांच्या जोरावरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पाडता आली. या फुटीमुळे देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी ठरले. त्यांना यासंबंधी मोठा राजकीय त्रास सहन करावा लागला.

उद्धव ठाकरेंपासून मनोज जरांगेंपर्यंत सर्वांनी फडणवीस यांना त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी देण्यात आली. शरद पवारांनी तर कथितपणे त्यांची जातच काढली. पण त्यानंतरही देवेंद्र फडणवीस डगमगले नाहीत. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपचा वारू पुढे नेण्याचे काम केले. त्यानंतर आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणून दाखवण्याचा करिश्माही करून दाखवला.

2) बिहार व मध्यप्रदेश मॉडेल महाराष्ट्रात चालणार नाही

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यासाठी बिहार मॉडेलचा युक्तिवाद केला जात आहे. बिहारमध्ये जदयुला कमी जागा असतानाही भाजपने तिथे नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. विशेषतः फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे मागासवर्गीयांचे राजकारण लक्षात घेता मध्य प्रदेशाच्या धरतीवर एखाद्या फारशा चर्चेत नसणाऱ्या ओबीसी नेत्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचाही आग्रह धरला जात आहे. भाजपने गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात हा प्रयोग केला. पण महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे.

महाराष्ट्रात 6 पक्षांनी निवडणूक लढवली. त्यात 3 पक्षांना बहुमत मिळाले. त्यापैकी एखादा पक्ष नाराज झाला तर नवे समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे हे भाजपला चांगलेच ठावूक आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाला येथे सोशल इंजिनिअरिंग विसरून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागेल अशी चर्चा आहे. 

Sakhi

3) सर्वाधिक प्रचारसभा घेतल्या

भाजपच्या नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांची उंची व लोकप्रियतेची जाणीव होती. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अधिकाधिक रॅली आणि प्रचार सभा घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यांच्या ब्राह्मण असण्याने किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर मतदार चिडले असते तर कदाचित त्यांना पक्षाचा मुख्य चेहरा बनवून बढतीची बक्षीशी दिली गेली नसती.

4) संघ व भाजपचा विश्वसनीय चेहरा

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या हाराकिरीनंतर देंवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केली होती. ही एक मोठी घटना होती. संघ अशा पद्धतीने कुणाचीही बाजू घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाही. फडणवीस यांच्या यांच्या घरी संघ व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यासंबंधीची बैठक झाली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी बाहेर येऊन पक्षाने फडणवीस यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचे सांगितले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनपेक्षित विजयात संघाचाही महत्त्वाचा वाटा होता, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. संघावर प्रत्येक वेळी विश्वास व्यक्त करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. यासोबतच देवेंद्र फडणवीस हेच ते नेते आहेत, ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचाही अतूट विश्वास आहे.

5) उच्च श्रेणीचे प्रशासक व संघटक

महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. देशाच्या जीडीपीच्या 13 टक्के महसूल या एकट्या राज्यातून येतो. आजही देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक याच राज्यात येते. यंदाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासक म्हणून आपला ठसा उमटवला आहे.    

Tags:

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले