रोहित पवारांनी घेतले काका अजित पवारांचे दर्शन, म्हणाले- ही आपली संस्कृती

अजित पवार म्हणाले- पठ्ठ्या, मी जर सभा घेतली असती तर काय झालं असतं

On
रोहित पवारांनी घेतले काका अजित पवारांचे दर्शन, म्हणाले- ही आपली संस्कृती

विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड मधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी अजित पवार आणि आमदार रोहित पवार समोरासमोर आले. रोहित पवार यांनी चरणस्पर्श करत अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले. या दरम्यान अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हणाले की, 'बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...' असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला.

RCC New

RCC New

विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार सामना झाला होता. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. इतकेच नाही तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यभरात 41 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी सांगितलेला दावा त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

विधानसभा निवडणूक सुरू होण्याच्या आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. रोहित पवार यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर थेट टीका केली. मात्र अजित पवार यांनी अद्याप रोहित पवार यांना जशाच तसे उत्तर दिलेले पाहायला मिळाले नव्हते. मात्र, आता अजित पवार यांनी भेट झाल्यानंतर रोहित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. रोहित पवार यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विजय झाला असला तरी त्यांच्यासाठी हा निसटता विजय म्हणावा लागेल. अगदी थोड्याफरकाने रोहित पवार हे विजयी झाले आहेत. त्यातच अजित पवार यांनी आता माझी सभा झाली असती तर... असे म्हणत रोहित पवार यांना इशारा दिला आहे.माझ्या विरोधात माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाला म्हणजे माझ्या सख्ख्या पुतण्याला उभे करण्याचे काहीच कारण नव्हते. बारामतीमध्ये इतरही अनेक उमेदवार होते. लोकसभा निवडणुकीत माझी चूक झाली हे मी आधीच सांगितलं होते. मात्र, तरी देखील माझ्या विरोधात माझा सख्खा पुतण्या उभा केला. अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Sakhi

अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात खूप काम केले आहे. त्याची आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र युगेंद्र पवार यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. ते व्यवसाय करणारे आहेत. मात्र तरीसुद्धा शरद पवार यांनी त्यांनाच माझ्या विरोधात उभा केले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे धर्मराजबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्या स्वतःच्या मुलीला उभे केले. माझ्या विरोधात सख्खा पुतण्या उभा केला, अशा अनेक ठिकाणी शरद पवार यांनी घरातली माणसे काढून उभे केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आमचे शिंगणे यांच्या विरोधात देखील सख्या पुतणीला उभे करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, तेच तिकडे गेल्याने तसे झाले नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असला तरीसुद्धा कोणाला उमेदवारी द्यायची, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तो व्यक्ती समाजात काम करणारा असेल, समाजातील जनतेची तशी मागणी असेल, तर गोष्ट वेगळी. मात्र घरातील कोणालातरी विरोधात उमेदवारी द्यायची, हे योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Tags:

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले