एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
म्हणाले- महायुतीत कोणतेही वाद नाही, CM पदावरुन हात जोडले
महायुतीतील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन पुढील वाटचाल ठरवली जाईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर भाष्य केले. नागपूर येथे पत्रकारांशी फडणवीसांनी संवाद साधला.
RCC New
महायुतीत कोणताही वाद नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित दादा पवार असतील. आम्ही सगळे एकत्रितच आहोत. आमच्या महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितले होते की सगळे निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी असतील ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील. त्यामुळे मला असे वाटते की कोणाच्या मनात किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे.
आधी मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊ द्या
मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय लवकरच घेतील. आम्ही सगळे पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करत आहोत. लवकरच आपल्याला याचे उत्तर मिळेल. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मुख्यमंत्री ठरल्यानंतर ते मंत्रीपदे कोणाला द्यायची हे ठरवतील. त्यामुळे मला असे वाटते की, आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी. त्यानंतर मंत्र्यांची देखील जी नावे आहेत, ती लक्षात येतील.
Sakhi
..तर फडणवीसांनी हात जोडले
पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, असा प्रश्न विचारला असता त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले. या संदर्भात आमचे श्रेष्ठी यांच्यासोबत बैठक होईल आमची. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा फडणवीसांनी हात जोडले.