आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत

On
आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत

Maharashtra Assembly Election : 2024 वरळी विधानसभा मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरेंसमोर शिवसेनेच्या (शिंदे गट) मिलिंद देवरा आणि मनसेच्या संदीप देशपांडे यांचं आव्हान होतं. पण या दोन्ही उमेदवारांचं आव्हान संपुष्टात आणत आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे. 

RCC New

RCC New

विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपासूनच वरळी मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर, आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडेंना तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी देण्यात आली होती. तिन्ही उमेदवारांमध्ये अत्यंत चुरस रंगली होती. 

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. विद्यमान आमदार वि. महायुती आणि मनसे अशी लढत चुरशीची ठरली. मिलिंद देवरा लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आले आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर खासदारही केलं. पण वरळीतून टक्कर देणारा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मिलिंद देवरा यांना पुढं केलं.

मुंबईतील वरळी मतदारसंघानं कायमच शहराच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई शहरातील प्रमुख भागांना जोडणाऱ्या या भागामुळं हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा. सुरुवातीला या मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा होता. 2014 च्या निवडणुकीत मात्र इथं शिवसेनेनं पुन्हा आपली जागा मिळवली. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघात गतकाळातील निवडणुकीत 89248 मतांनी घवघवीत यश मिळवलं. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढं मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं आव्हान असल्यामुळं या तिरंगी लढतीकडे सर्वांचंच लक्ष असेल. 

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. तेव्हा महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेतर्फे आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला होता. पण यंदा मात्र ( 2024च्या निवडणुकीत) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार उतरवला. मनसेने संदीप देशपांडे यांना तिकीट दिलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोर दोन तगड्या उमेदवारांचं आव्हान होतं. वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. वरळीत अमराठी मतंही मोठी असून देवरांनी अमराठी मतांवर पकड आहे. वरळीत गुजराती मतदारांचीही संख्या निर्णायक ठरु शकतात. 2019 मध्ये सोप्या लढाईत आदित्य ठाकरे यांनी 89 हजार 248 मतं घेत विजय मिळवला होता. पण नुकत्याच झालेल्या दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत, वरळीतून ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी फक्त 6175 मतांवर आली.

Advertisement

Latest News

जनतेनेच सांगितले ; खरी शिवसेना कोणाची ? ; बहुसंख्य ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांचा विजय जनतेनेच सांगितले ; खरी शिवसेना कोणाची ? ; बहुसंख्य ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांचा विजय
2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि बंड केले. 40 आमदार आणि आठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि...
आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा विजय
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार : भाजपच्या यशामुळे फडणवीस यांचा दावा भक्कम
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांचा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठी आघाडी
शरद पवार, उद्धव ठाकरेंची दक्षता; संभाव्य फूट अन् ​​​​​​​दगाफटक्याची भीती उचलले मोठे पाऊल
छोटे पक्षच किंगमेकर ठरणार - महादेव जानकर