मराठवाड्यात 46 पैकी 29 मराठा आमदार निवडून आले, 26 महायुतीचे तर 3 महाविकास आघाडीचे!

मराठा समाजाने महायुतीलाच दिला पाठिंबा; घोषणा, माघार अन जरांगे पाटलांचा प्रभाव संपला का, वाचा-राजकीय विश्लेषण...!

On
मराठवाड्यात 46 पैकी 29 मराठा आमदार निवडून आले, 26 महायुतीचे तर 3 महाविकास आघाडीचे!

Marathwada Maratha Reservation, Jarange Factor, Read Analysis : मराठा आरक्षणाचे गड ठरलेल्या मराठवाड्यातच जनतेच्या दरबारी मराठा आरक्षण फॅक्टर फेल झाल्याचे समोर आले आहे. विभागात महायुतीचे सर्वाधिक 26 मराठा आमदार विजयी झालेत. तर महाविकास आघाडीचे केवळ 3 मराठा आमदार निवडून आलेत.

त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आरक्षण मागणीला त्यांच्या भागातच मतदारांनी सपेशल नाकारत आपला कौल महायुती आणि त्यातही भाजपच्या बाजूने दिल्याचे दिसते. मराठवाड्यात एकूण 46 मतदार संघ आहेत. त्यात सर्वाधिक 29 मराठा आमदार विजयी झालेत. तर ओबीसी 9, एससी 5, अल्पसंख्याक 2, तर एका जागेवर आदिवासी समाजाचा उमेदवार विजयी झालाय.

RCC New

RCC New

घोषणा, माघार, प्रभाव संपला
मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या म्हणत आंदोलन थांबवणाऱ्या आणि त्यानंतर पुन्हा सरकारविरोधात वारंवार आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मुस्लीम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती. जरांगे यांनी बीड शहर, केज, परतूर, फुलंब्री, हिंगोली शहर, पाथरी, हदगाव या 7 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला होता. तर भोकरदन, गंगापूर, कळमनुरी, गंगाखेड, जिंतूर, औसा या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडापाडी मोहीम राबवण्याचा इशारा दिला होता. तर 2 मतदासंघांमध्ये पाठिंबा देण्याचे ठरवले होते.

मात्र, उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत मित्र पक्षांची यादी आली नसल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर तुम्हाला कोणाला पाडायचे त्यांना पाडा आणि निवडून द्या, अशी भूमिका जाहीर केली. मात्र, ही भूमिकाही त्यांनी अनेकदा बदलत महायुतीला पाडण्याचे इशारे दिले. छगन भुजबळांच्या विरोधात प्रचारही केला. मात्र, जरांगे आणि त्यांची मराठा आरक्षणाची मागणी या दोन्हींची जादू विधानसभा निवडणुकीत तरी चालली नाही.

जरांगेंची जेथून माघार तिथले चित्र...
1) केज - नमिता मुंदडा, भाजप
2) परतूर - बबनराव लोणीकर, भाजप
3) फुलंब्री - अनुराधा चव्हाण, भाजप
4) हिंगोली - तानाजी मुटकुळे, भाजप
5) पाथरी - राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
6) हदगाव - बाबूराव कदम-कोहळीकर, शिवसेना (शिंदे)
7) बीड - संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

जरांगेंनी जिथे पाडापाडीचे आव्हान केले, तिथले चित्र....
1) भोकरदन - संतोष दानवे, भाजप
2) गंगापूर - प्रशांत बंब, भाजप
3) कळमनुरी - संतोष बांगर, शिवसेना (शिंदे)
4) गंगाखेड - रत्नाकर गुट्टे, रासप
5) जिंतूर - मेघना बोर्डीकर, भाजप
6) औसा - अभिमन्यू पवार, भाजप

Sakhi

सर्वाधिक मराठा आमदार भाजपचे
विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात सर्वाधिक 11 मराठा आमदार भाजपचे निवडून आलेत. शिवसेना शिंदेंचे 9, तर राष्ट्रवादी अजित पवार यांचे 6 मराठा आमदार निवडून आलेत. यात महाविकास आघाडीचे केवळ 3 मराठा आमदार विजयी झालेत. त्यात शिवसेना ठाकरे यांचे 2, तर 1 आमदार काँग्रेसचा आहे.

शरद पवारांना नाकारले
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाड्यात 15 जागी निवडणूक लढवली. त्यात त्यांनी 8 मराठा उमेदवारांना तिकीट दिले. मात्र, त्यांचा एकही मराठा उमेदवार विजयी झाला नाही. त्यांच्या पक्षाचे एकमेव ओबीसी आमदार संदीप क्षीरसागर हे मराठवाड्यातून बीड येथून निवडून आले. खरे तर शरद पवारांना मराठा नेता म्हणून ओळखले जाते. मात्र, त्यांनाही जनतेने नाकारल्याचे दिसते.

राज्यात 29 मराठा आमदार
विधानसभा निवडणुकी भाजपसह शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांसह एकूण 60 मराठा उमेदवार रिंगणात होते. यातले 29 जण आमदार झालेत. मराठवाड्यातल्या 29 मराठा आमदारांमध्ये नांदेड येथून 6, लातूर 4, छत्रपती संभाजीनगर 4, जालना 4, परभणी 3, बीड 3, धाराशिव 3, हिंगोली येथून 2 जण निवडून आलेत.

मराठवाड्यात 9 ओबीसी आमदार
मराठवाड्यात 9 ओबीसी, 5 एससी, 2 अल्पसंख्यात (एक जैन, एक मुस्लीम), तर 1 आमदार आदिवासी समाजातला निवडून आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून प्रत्येकी 2 ओबीसी आमदार निवडून आलेत. नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यातून प्रत्येक 1 ओबीसी आमदार निवडून आलाय, तर जालना जिल्ह्यातून एकही ओबीसी आमदार निवडून आलेला नाही.  

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले