महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांचा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठी आघाडी
येवल्यात छगन भुजबळ पिछाडीवर, मुख्यमंत्री शिंदे आघाडीवर, उपमुख्यमंत्री अजित पवारही पुढे
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सर्व प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच लढत आहे.
दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा समावेश आहे.
RCC New
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार की नाना पटोले? अपक्ष आणि छोटे पक्ष किंगमेकर बनतील का? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज दुपारी 12 वाजेपर्यंत मिळणार आहेत.
20 नोव्हेंबरला मतदान, आज निकाल
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले होते. 2019 च्या तुलनेत यावेळी 4% जास्त मतदान झाले. 2019 मध्ये 61.4% मतदान झाले. यावेळी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल आले.
#WATCH | Counting of votes gets underway in Baramati for Maharashtra Assembly elections pic.twitter.com/963nYpZnGg
— ANI (@ANI) November 23, 2024
यावेळी 65.11% मतदान झाले. 11 पैकी 6 पोलमध्ये भाजप युती म्हणजेच महायुती सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
#WATCH | Nagpur: On the counting of votes for #MaharashtraElection2024, Prahar Janshakti Party leader Bacchu Kadu says, "I feel that politics of caste and religion has taken place in these elections. Issue-based discussions were not placed, this is unfortunate. I also feel that… pic.twitter.com/EoThPsiQx9
— ANI (@ANI) November 23, 2024
4 निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी (MVA) आणि एका मतदानात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पोस्टल मतांमध्ये फडणवीसांना आघाडी, पाहा विदर्भातील सध्याचे कल
- नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडवणीस पोस्टल मतांवर आघाडीवर
- चंद्रपूर ब्रह्मपुरी मतदार संघामध्ये विजय वडेट्टीवार आघाडीवर पोस्टल मतदानावर
- साकोली मध्ये नाना पडोळे पोस्टल मतदानावर आघाडीवर
- भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे पोस्टल मतदानावर कामठीतून आघाडीवर
- समीर मेघे पोस्टल मतदानावर आघाडीवर हिंगणा मध्ये भाजपाचे उमेदवार
- काटोलमध्ये चरण सिंग ठाकूर पोस्टल मतावर आघाडीवर भाजपाचे उमेदवार
#WATCH | Mumbai | Shiv Sena candidate from Dindoshi Assembly constituency, Sanjay Nirupam says, "I have come here to seek blessings of Shree Siddhivinayak. I am confident that I will emerge victorious with his blessings. Just like me, candidates of Shiv Sena, BJP and Ajit… pic.twitter.com/Or1sEuhTDi
— ANI (@ANI) November 23, 2024