वेडी बहि‍णींची वेडी माया, जबरदस्त विजयानंतर मुख्यमंत्री म्हणाले- लाडक्या बहीणींना 2100 रुपये देणार 

सरकार स्थापन होताच 2100 रुपयांचा हप्ता चालू होणार; लाडकी बहिणच ठरली सरकारची गेमचेंजर  

On
वेडी बहि‍णींची वेडी माया, जबरदस्त विजयानंतर मुख्यमंत्री म्हणाले- लाडक्या बहीणींना 2100 रुपये देणार 

Eknath Shine on Maharashtra Assembly Election 2024 :  राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने तब्बल 236 जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे, निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

RCC New

RCC New

आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहि‍णींचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या, तसेच लाडक्या बहि‍णींसाठी मोठी घोषणा देखील केली. शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहि‍णींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केलं. 

लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहीट झाली. माझी बहिण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी, तर काही लोकं फिट येऊन चक्कर येऊन पडल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धूऊन टाकलंय अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहि‍णींवर कौतुकाचा वर्षाव केला. 

राज्यात यंदा लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले, हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. त्यामुळे, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता, लवकरच तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे 2100  करणार असून याचासुद्धा निर्णय आपण घेतल्याचे शिंदेंनी सांगितले. तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी झाला, समोरच्या लोकांना तुम्ही डम्पिंगमध्ये टाकून दिलं असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता विरोधकावर टीका केली. 


 .   

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले