IPL लिलावाच्या पहिल्या दिवशी कोण बनला सर्वात महागडा खेळाडू; टॉप-5 प्लेअर्स कोणते? 

कोणी मारली सर्वाधिक पैसे घेऊन बाजी, वाचा- IPL Auction 2025 विषयी सर्व काही

On
IPL लिलावाच्या पहिल्या दिवशी कोण बनला सर्वात महागडा खेळाडू; टॉप-5 प्लेअर्स कोणते? 

IPL Auction 2025 : सौदी अरेबियामधील जेद्दाह येथे रविवारी झालेल्या आयपीएल 2025 लिलावाच्या सुरुवातीच्या फेरीत भारतीय खेळाडूंनी कहर घातला. लिलावाची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या एका तासांमध्ये भारतीय खेळाडूने जगभरातील मीडियाचे मथळेच फिरवले. कारण, भारतीय खेळांडूंवर लागलेली बोली ही आतापर्यंतची सर्वाधिक बोली होती.

RCC New

RCC New

अर्शदीप सिंगपासून लिलावाची सुरूवात झाली. त्याला पंजाब किंग्जने त्याचे राईट टू मॅच कार्ड वापरुन 18 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. अर्शदीप नंतर लगेचच, श्रेयस अय्यरने IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनून इतिहास रचला, त्याला पंजाब किंग्जने ₹ 26.75 कोटींमध्ये विकत घेतले. तथापि, हा विक्रम फार काळ टिकला नाही, कारण काही मिनिटांनंतर ऋषभ पंतला लखनौ सुपरजायंट्सने 27 कोटीं रुपयांना विकत घेतले. 

टॉप-5 भारतीय खेळाडूंची यादी

ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींना विकत घेतले.

श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना विकत घेतले.

युझवेंद्र चहल, पंजाब किंग्स, रु. 18.

केएल राहुल, दिल्ली कॅपिटल्स, 14 कोटी रु. 

पंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लखनौने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंतच्या आधी पंजाबने अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतले.

लखनौ आणि बंगळुरूने सुरुवातीला पंतसाठी बोली लावली. सनरायझर्स हैदराबादने नंतर 11.75 कोटी रुपयांमध्ये प्रवेश केला, परंतु लखनौने 20.75 कोटी रुपयांची शेवटची बोली लावली. यानंतर दिल्लीने त्यांचे आरटीएम कार्ड वापरले, त्यानंतर लिलावकर्त्याने लखनऊला त्यांची अंतिम बोली मागितली, ज्यावर संघाने सर्वाधिक बोली लावली आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.

कार अपघातानंतर त्याचे IPLमध्ये कमबॅक

2020 मध्ये पंतला दिल्लीने कर्णधार बनवले होते. यानंतर पुढच्याच वर्षी कार अपघातामुळे तो संघाबाहेर होता. 2024 मध्ये पंत पुन्हा दिल्लीच्या कर्णधारपदी परतला. त्याने 13 सामन्यात 446 धावा केल्या ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 

शमीला 10 कोटींत हैदराबादने विकत घेतले

दुसऱ्या मार्की लिस्टमधील कॅप्ड खेळाडू मोहम्मद शमीला हैदराबादने 10 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मागील हंगामात  भारताचा वेगवान गोलंदाज शमी दुखापतीमुळे खेळला नव्हता. यापूर्वी तो 2023 मध्ये गुजरातकडून खेळला होता. या मोसमात, त्याने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या आणि या स्पर्धेतील पर्पल कॅप धारक देखील होता. 

Tags:

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले