आयसीसी रॅकिंगमध्ये पुन्हा बुूमराहचाच प्रथम क्रमांकावर, पर्थ कसोटीत केली जबरदस्त कामगिरी
विराट कोहली कितव्या स्थानावर पोहोचला, वाचा आयसीसी क्रमवारीची ताजी आकडेवारी
आयसीसी रॅकिंग नुकतीच जाहीर झाली आहे. यात पुन्हा एकदा भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा ICC कसोटी क्रमवारीत टॉप स्थानी पोहोचला आहे. आयसीसीने बुधवारी नवीन रॅकिंग जाहीर केली. भारत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील पहिल्या कसोटीत बुमराहने आठ विकेट्स घेतल्या होत्या.
RCC New
साऊथ आफ्रिकेच्या रबाडाला टाकले मागे
आयसीसीच्या क्रमवारीनुसार, बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकले आणि या वर्षामध्ये दुसऱ्यांदा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत रबाडा आणि जोश हेझलवूड यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर होता. परंतु, या बुधवारी झालेल्य क्रमवारीत तो टॉप स्थानावर पोहोचला आहे.
श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणारा रबाडा कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाच बळी घेतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या स्थानावर आहे.
Fitting ICC Rankings jumps after a famous Perth win 📈
— ICC (@ICC) November 27, 2024
More 👉 https://t.co/250NfTAfUr pic.twitter.com/ygdthJxeww
यशस्वीनेही उडी घेतली
भारताच्या ऑस्ट्रेलियावर 295 धावांनी विजय मिळवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या यशस्वी जैस्वालनेही क्रमवारीत झेप घेतली आहे. यशस्वीने फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या इंग्लंडचा जो रूट त्याच्या समोर आहे. यशस्वीचा रेटिंग पॉइंट 825 आहे जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे.
Sakhi
यशस्वीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली होती. मात्र, पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. यशस्वीने केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली होती.