भारत-ऑस्ट्रेलिया पहिली पर्थ कसोटी : पहिल्या दिवशी भारताची बाजू मजबूत

जसप्रित बुमराहने घेतल्या चार विकेट्स, दिवसभराच्या खेळात काय काय घडलं, वाचा सविस्तर 

On
भारत-ऑस्ट्रेलिया पहिली पर्थ कसोटी : पहिल्या दिवशी भारताची बाजू मजबूत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघ  83 धावांनी पुढे असून ऑस्ट्रेलियाच्या फक्त 3 विकेट शिल्लक आहेत. ऑप्टस स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही आणि संघ दीडशे धावांवर सर्वबाद झाला. जोश हेझलवूडने 4 विकेट घेतल्या.

RCC New

RCC New

दुसरीकडे  भारताने गोलंदाजीमध्ये जोरदार पुनरागमन  केले आणि ऑस्ट्रेलियाने 59 धावांत 7 विकेट गमावल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाच्या 67 धावा झाल्या होत्या, ॲलेक्स कॅरीने 19 आणि मिचेल स्टार्क 6 धावा करून नाबाद परतले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या.
 

बुमराहने 4 विकेट घेतल्या

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने 11, नॅथन मॅकस्विनीने 10, उस्मान ख्वाजाने 8, मिचेल मार्शने 6, पॅट कमिन्सने 3 आणि मार्नस लॅबुशेनने 2 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. भारताकडून आतापर्यंत जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षित राणाला 1 बळी मिळाला. 

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन मॅकस्वीनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन.

Tags:

Advertisement

Latest News

धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय धीरज देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का रमेश कराड यांचा विजय
Maharashtra Assembly Election 2024 राज्यातल्या  विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. राज्यात महाविकासाघाडीला मोठा झटका बसला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा...
जनतेनेच सांगितले ; खरी शिवसेना कोणाची ? ; बहुसंख्य ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांचा विजय
आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला; महायुतीचा डाव फसला, संदीप देशपांडे, मिलिंद देवरा पराभूत
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा विजय
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार : भाजपच्या यशामुळे फडणवीस यांचा दावा भक्कम
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांचा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला मोठी आघाडी
शरद पवार, उद्धव ठाकरेंची दक्षता; संभाव्य फूट अन् ​​​​​​​दगाफटक्याची भीती उचलले मोठे पाऊल