'साईनंदनवनम वृदांवन पार्क' ठरत आहे मराठवाड्यातील पर्यटकांची पहिली पंसत
चाकूर येथील पार्कमध्ये पर्यटकांसाठी आकर्षक अशा नवीन राईडस सुरु !
चाकूर / प्रतिनिधी : येथील सुप्रसिध्द साईनंदनवनम मधील वृंदावन पार्कला पर्यटकाची मोठी पंसती मिळत असून आता नवीन राईड पर्यटकांना उपलब्ध करून दिल्याने दिवसभर वॉटर पार्कला मोठी गर्दी होत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून तसेच आंध्रप्रदेश,कर्नाटकातूनही पर्यटक मोठ्या संख्येने येऊन या वॉटर पार्कचा आनंद घेतात.जे जे नवीन ते या वृदांवन वॉटर पार्कमध्ये उपलब्ध करून दिले जाते. नवनवीन राईडस आणुन पर्यटकांच्या आनंदात भर घालतात.निसर्ग रम्य परिसर आणि पर्यटकाच्या सुरक्षिततेची काळजी घेतल्यामुळे याठिकाणी पर्यटक बिनधास्तपणे मनमुराद आनंद घेतात.
RCC New
मराठवाड्यासारख्या कमी पर्जन्यमान असलेल्या लातूर जिल्यातील चाकूर येथे साईनंदनवनम हा परिसर निसर्गाच्या अनुकूल सानिध्यात विविध फळा फुलांने बहरला आहे.या परिसरात विविध पशु-पक्षी यांचे वास्तव्य आहे.राज्य पर्यटन विकास महामंडळाची मान्यता असलेल्या 'साईनंदनवनम्'येथे कृषी व ग्रामीण संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो.
त्यामुळे साईनंदनवनम् कडे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.ग्रामीण कृषी पर्यटन म्हणूनही याचे महत्त्व वाढलेले आहे. या पर्यटन स्थळाला दरवर्षी महाराष्ट्रातून शैक्षणिक सहली येतात. यावेळी कृषीतज्ज्ञ, निसर्ग प्रेमी,आणि यात्रेकरू असे जवळपास सव्वा-ते दीडलाख पर्यटकांने या स्थळाला भेट दिलेल्या आहेत.
याठिकाणी वृंदावन अॅम्युजमेंट पार्क, महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा शिवालय, तिरूपती बालाजीचे जाज्वल मंदिर आदी देवी देवतांचे दर्शन याठिकाणी होते.त्यामुळे वृंदावन कृषी पर्यटनाला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असून ग्रामीण संस्कृतीसह कृषी पर्यटन बहरत आहे. या वृंदावन पार्कमध्ये आलेल्या पर्यटकांना मनमोकळेपणाने आनंद घेता येतो.
त्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाते.यामुळे हे पर्यटन दिवसेंदिवस नावलौकिक होत आहे. याशिवाय लहान मुलांसाठी स्वतंत्र प्ले ग्राऊंड, तसेच खाद्य प्रेमींसाठी देखील येथे उत्तम रेस्टॉरंट आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी पर्यटनाचा मनमुराद आस्वाद घेता येतो. त्यामुळे मराठवाड्यासह राज्याच्या इतर ठिकाणाहून देखील पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
Sakhi
महाराष्ट्रात इतर कोणत्याही वॉटर पार्कला नसलेली स्लीप अँड फ्लाय राईडस नुकतीच पर्यटकासाठी खुली करण्यात आली आहे.तसेच नोव्हेंबर अखेर पर्यत सर्वात मोठा व्हेल पुल पर्यटकाच्या सेवेत रूजू होणार आहे.त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित होणार असल्याची माहिती वृदांवन पार्कचे संचालक विशाल जाधव यांनी दिली आहे.