अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले

25 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त;वाचा लातूर जिल्ह्यात कुठे झाली कारवाई 

On
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले

उदगीर/प्रतिनिधी : अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवार (दि.२६) रोजी रात्री जप्त करून दोन आरोपीवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उदगीर पोलिसांनी उदगीर शहरात केली आहे. 

RCC New

RCC New

याबाबत सविस्तर वृत असे की, एम.एच.२६ सीएच ८८८० या क्रमांकाच्या टिप्परमध्ये चार ब्रास वाळू आरोपीने संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची परवानगी न घेता महसूल बुडवून वाहतूक करीत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने उदगीर शहरातील उमा चौकातील एचडीएफसी बॅंकेसमोर २६ नोव्हेंबर रोजी रात्री पकडला.

यावेळी अवैध वाळूसह टिप्पर असा 25 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी केशव त्र्यंबक आढावा रा.सुनेगाव ता.लोहा जि. नांदेड, व तिरुमला दिगंबर डिकळे रा.पारडी ता.लोहा, जि. नांदेड यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरंन ३१२/२४ कलम ३०३(२),३ (५) भारतीय न्याय संहिता सह कलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार मंगळवार (दि.२६) रोजी रात्री १२ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Sakhi

याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार गायकवाड हे करीत आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार स्वामी, देशमुख, बुड्डे, कुंभार यांच्या पथकाने केली.

  

Tags:

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले