भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो शिवसेनेला मान्य असेल- एकनाथ शिंदेंची घोषणा
म्हणाले- लाडकी बहीणीचा लाडका भाऊ हीच माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मी स्वत:ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. मी स्वत:ला कॉमन मॅन समजून जनतेसाठी काम केले, असे शिंदे म्हणाले. महायुतीने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांसाठी आम्ही काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
RCC New
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही पुढे नेली, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. केंद्रातून त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला, असे ते म्हणाले.
एक साधा कार्यकर्ता म्हणून मी करतो. सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्यांना गरिबांच्या वेदना कशा कळणार. त्यामुळे महायुतीने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांसाठी आम्ही काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे.
Sakhi
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी नाराज नाही, तसेच नाराज होऊन रडणाऱ्यांमधला मी नाही. मी नरेंद्र मोदींना माझ्या भावना कळवल्या आहेत. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, माझ्यामुळे अडचण होईल हे मनात आणू नका, असे मी मोदींशी फोनवर बोलून सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.