विधानसभा निकालानंतर 'हे' बहीण भाऊ, सख्खे भाऊ अन् काका पुतणे सभागृहात दिसणार..! 

मतदारांनी घराणेशाहीला दिले पाठबळ, नातेसंबंधातील आमदार कुठे कुठे जिंकले; जाणून घ्या सविस्तर 

On
विधानसभा निकालानंतर 'हे' बहीण भाऊ, सख्खे भाऊ अन् काका पुतणे सभागृहात दिसणार..! 

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला भरगच्च यश मिळाले. या निकालात एक महत्त्वाची बाब देखील समोर आली आहे. एकीकडे घराणेशाहीच्या मुद्दयावरुन नेहमीच टीका करणाऱ्या मतदारांनी या घराणेशाहीला पाठबळ दिल्याचं निवडणूक निकालानंतर पाहायला मिळत आहे. 

RCC New

RCC New

कोकणातून राणे कुटुंबीय, मराठवाड्यात चव्हाण आणि भुमरे कुटुंबीय, संतोष दानवे व संजना जाधव हे बहीण भाऊ, ठाण्यातील शिंदे कुटुंबीय, बारामतीत पवार कुटुंबीय, मुंबईत गायकवाड कुटुंबीयांमध्ये एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, निवडणूक मतमोजणीनंतर नव्या विधानसभेतल्या नातेसंबंधाचा योगायोग पाहायला मिळणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत 6 महिन्यांपूर्वीच खासदार बनलेल्या काही नेत्यांची घरातील मंडळीच आता विधानसभेत आमदार बनल्याचं चित्र आहे.  यंदाच्या निवडणुकांवेळी विधानसभेसाठी भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, दोन मावसभाऊ अशा जोड्या तयार झाल्याचे पाहायला मिळत  आहे. 

एकाच कुटुंबातील खासदार-आमदार 5 जोड्या

  • माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले विधानसभेच्या रिंगणात होती. या दोन्ही मुलांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने ते आमदार बनले आहेत. त्यामुळे, एकाच घरात वडील खासदार आणि दोन्ही मुले आमदार आहेत. नारायण राणे यांचे नीतेश राणे व निलेश राणे हे दोन्ही पुत्र आता आमदार झाले आहेत.
  • मुंबईत मोठी बहीण खासदार तर धाकटी आमदार असा योग साधलाय. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड धारावीतून लोकसभा खासदार बनल्या आहेत. त्यानंतर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांनी विजय मिळवत त्या आमदार बनल्या आहेत. 
  • नांदेडमधून वडिल राज्यसभेत आणि मुलगी विधानसभेत असे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री आणि खा. अशोक चव्हाण  यांची मुलगी श्रीजया चव्हाण या निवडणुकीतून आमदार बनल्या आहेत. त्यामुळे, एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी नांदत आहे.
  • बारामधून पत्नी राज्यसभा सदस्य आणि पती विधानसभेत आमदार. अर्थात हे घडलं आहे, बारामती विधानसभा मतदारसंघातून.  उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा निवडून आलेत. तर सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार बनल्या आहेत.

भाऊबंदकी विधानसभेत

  1. अजित पवारांनी त्यांच्या एका पुतण्याला पराभूत केलं असलं तरी त्यांचा दुसरा पुतण्या कर्जत-जामखेडमधून विधानसभा सभागृहात दाखल झाला आहे.
  2. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले आहेत. तत्पूर्वी लोकसभेत त्यांचे चिरंजीव हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या घरात आमदारकी आणि खासदारकी आहे. 
  3. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई दोघेही विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे, येथेही नात्यागोत्यांची घराणेशाही दिसून येते 

देशमुख बंधूपैकी एकच जण विधानसभेत असणार

निवडणुकीच्या अभूतपूर्व निकालानंतर काही योगायोग होता होता राहिले आहेत. त्यामध्ये लातूरमधून दोन सख्खे भाऊ आधीच्या विधानसभेत होते, यावेळी देशमुखबंधूपैकी धीरजचा पराभव झाला आणि दोन भावांच्या दुसऱ्या जोडीला विधानसभेत जाता आलं नाही.

दानवे यांचा मुलगा व मुलगी आमदार 

माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांची दोन्ही मुले आमदार बनली आहेत. मुलगा संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत दाखल होत आहेत.  

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले