विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण; राजकीय अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांचा अहवाल समोर!
मुंबई : विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये (घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षणाने समोर येतो. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचा डंका वाजताना पाहायला मिळतो. काँग्रेस असो किंवा भाजप, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना सर्वच राजकीय नेत्यांच्या वारसदार, पुढची पिढी, युवा नेते बनून राजकारणात एन्ट्री करते.
RCC New
सर्वच पक्ष माळेचे मणी, सर्वाधिक उमेदवार भाजपने दिले
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही हीच घराणेशाही प्रकर्षणाने दिसून आली. विशेष म्हणजे याबाबतीत सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, पण राज्यातील 288 मतदारसंघांपैकी, 237 मतदारसंघात घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार उभे असल्याचं चित्र दिसून आलं. त्यामध्ये, सर्वाधिक उमेदवार हे भाजपने दिले होते. पण, दोन राष्ट्रवादी एकत्र केल्यास घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार हे पवारांच्या राष्ट्रवादीनेच उभे केल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचं राजकारण पाहिल्यास, पवार, ठाकरे, थोरात, देशमुख, मुंडे, शिंदे, फडणवीस या बड्या नेत्यांनाही राजकीय वारसा किंवा त्यांचा वारसा पुढे नेणारे कुटुंबातील सदस्य असल्याचे दिसून येते. बारामतीमधील पवार कुटुंबात मोठा राजकीय वारसा असून तीन पिढ्यांपासून त्यांची घराणेशाही दिसून येते.
त्याचप्रमाणे ठाकरे, मुंडे, देशमुख यांसह राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. देशाच्या पंतप्रधान पदापासून ते सर्वच पक्षातील राजकीय नेते अनेक वेळा घराणेशाही वरून एकमेकांवर टीका करतात. निवडणुका म्हटल्या की घराणेशाही हा विषय नेहमीच समोर येतो.
237 पैकी 89 ठिकाणी घराणेशाहीतील लोकांचा विजय
यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा 288 मतदारासंघांपैकी जवळपास 237 मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळालं. घराणेशाहीची पार्श्वभूमीवर असलेले उमेदवार येथील मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, या 237 उमेदवारांपैकी केवळ 89 उमेदवारांनाच जनतेनं निवडणूक दिलं आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी याबाबतचा एक अहवाल समोर आणला आहे. घराणेशाही बाबतीत हेरंब कुलकर्णी यांनी आपला अहवाल सादर करताना याबाबतीत कायदेशीर नियमावली करण्याची मागणी सुद्धा केली आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या अहवालानुसार, घराणेशाहीतील 237 उमेदवारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवारांपैकी 32 टक्के उमेदवार हे घराणेशाहीशी निगडीत आहेत.
Sakhi
विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी शप - 39
शिवसेना ठाकरे - 19
भाजप - 49
राष्ट्रवादी अप- 26
शिवसेना शिंदे - 19
इतर - 43
लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार
विधानसभेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही घराणेशाही पाहायला मिळाली. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 36 जागांवर राजकीय घराणेशाहीतील उमेदवार उभे राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, घराणेशाही किती खोलपर्यंत पक्षात आणि जनतेतही रुजली आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांचे हे धोरण असून मी नाही त्यात... असं कुणीही म्हणून शकणार नाही, असेच चित्र आहे.
काँग्रेस - 7
राष्ट्रवादी शप- 3
शिवसेना ठाकरे - 6
भाजप - 14
राष्ट्रवादीअप - 1
शिवसेना - 5