एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण

भाजपने नेमकी काय जादू चालवली, अजित दादांनी निकाल लागताच कसा डाव टाकला, शिदेंचे टेन्शन का वाढले

On
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण

Maharashtra Assembly Election 2024 : राज्याचे सर्वात मोठे पद असलेल्या मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांनी असाच दावा नाही सोडला. त्यांनी अचानक प्रेस घेऊन मी माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. तर महायुतीत कोणतीही स्पर्धा नाही व मी कोणत्याही बाबतीत अडवून बसलेलो नाही, असे स्पष्ट केले.  परंतु, यामागे काही प्रमुख कारणं देखील समोर येत आहे. 

RCC New

RCC New

शिंदेंची माघार, महायुतीचा मार्ग मोकळा!

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी माघार घेत असल्याचे सांगितल्याने. आता महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजपचे मुख्यमंत्रीपद स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जाहीर केले की, मी स्वतःला कधीच मुख्यमंत्री मानत नाही. मी नेहमीच स्वतःला सामान्य माणूस समजतो. 

मोदी-शहांना फोन करुन सांगितले 

शिंदे म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. मुख्यमंत्र्यांबाबत आमच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नाही, असे मी त्यांना सांगितले. आमचे पूर्ण सहकार्य असेल. पण प्रश्न पडतो की चार दिवसांपासून सुरू असलेली अशांतता काय होती? गेल्या वेळी शिवसेना फोडताना ज्या पद्धतीने भाजपचे मत बदलले होते, तसेच काहीसे यावेळीही घडण्याची शक्यता शिंदे यांच्या मनात होती. पण परिस्थिती बदलली,.

Sakhi

भाजपकडे स्वत:चे बलाबल 

भाजपला सरकार स्थापनेसाठी आणखी 4 आमदारांची गरज आहे, हे एकनाथ शिंदे यांना माहीत आहे की, महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला तरी भाजपला केवळ 4 आमदारांची गरज भासणार आहे. कारण भाजप व अपक्ष मिळून भाजप सरकार स्वबळावर सरकार स्थापन करू शकते.  

पुन्हा शिवसेना फुटण्याची शक्यता 

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याप्रकारच्या घटना घडल्या आहेत, ते पाहता भाजप वगळता अन्य कोणत्याही नेत्याला आपल्या पक्षाच्या आमदारांवर विश्वास नाही. इथल्या राजकारणात काहीही अशक्य नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. शिवसेना MVA युतीत जाणे असो किंवा नंतर दोन तुकडे होणे असो, अजित पवार 2019 मध्ये काकांची बाजू सोडून 80 तासांच्या आत पुन्हा आले. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी फुटली. शिंदेंनी शिवसेना फोडून भाजपात गेले. त्यामुळे तीच भीती पुन्हा वाटते. 

ठाकरेंसारखे होऊ नये एवढंच फक्त
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायचेच यावर ठाम राहिले असते, तर उद्या त्यांना काँग्रेस आणि  महाविकास आघाडीच्या सोबत जावे लागले असते. विचारधारेशी तडजोड केल्याने उद्धव ठाकरेंचे काय झाले ते ते चांगलेच पाहात आहेत. लोकांमध्ये त्यांची ओळख किंवा पक्ष नव्हता. बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त असूनही आज जनतेने त्यांना विचारधारेमुळे नाकारले. कदाचित या सगळ्याचा विचार करून एकनाथ शिंदे यांना बंडखोरी करण्याऐवजी तडजोड करणे बरे वाटले असावे.  

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
Maharashtra Election 2024 :  देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणवीस आहेत....
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर का सोडले पाणी, वाचा त्यामागील नेमकं कारण
अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले; वाळू माफियांचे धाबे दणाणले