कोण होणार महाराष्ट्राचा CM?, सट्टा बाजारात एकाच नावाची चर्चा
उद्या लागणार निकाल, पक्षांचा रात्रीस खेळ झाला सुरू, कुठे काय घडतंय
राज्यात कुणाची सत्ता येणार, हे पुढील काही तासांमध्ये समजणार आहे. पण त्याआधीच मुख्यमंत्री कोण, यावरून महायुती व महाविकास आघाडीतही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सट्टा बाजारातही निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज वर्तवले जात असून आतापर्यंतचा कल महायुतीच्या बाजूने आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही सट्टा बाजारात अंदाज बांधले जात आहेत. यात एकाच नावाची चर्चा सद्या सुरू झालेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर...!
RCC New
महायुतीमध्ये प्रामुख्याने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन प्रमुख दावेदार आहे. त्यांच्या पक्षातील नेते याबाबत अनेक दावे प्रतिदावे करत आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येही यावरून जुगलबंदी सुरू आहे. सट्टा बाजारात मात्र एका नावाची सर्वाधिक चर्चा आहे. ते नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे.
फलोदी सट्टा बाजाराचा काय अंदाज?
मुंबई आणि राजस्थानातील फलोदी सट्टा बाजाराने राज्यात महायुतीचीच पुन्हा सत्ता येईल असा अंदाज वर्तवला आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत फडणवीस हे सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार महायुतीत भाजपला 90 ते 95 जागा मिळू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 35 ते 40 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या नावावर कोणत्या नावावर चर्चा?
फलोदी सट्टा बाजारानेही फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फडणवीसांवरह सर्वाधिक बोली लागत असल्याचे समजते. या बाजाराच्या अंदाजानुसार महायुतीला 144 ते 152 जागा मिळू शकतात. तर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज आहे.