युपीतील जामा मशिदीचे सर्व्हेक्षणावरुन संभलमध्ये मोठा हिंसाचार; 4 जण ठार
अधिकाऱ्यांसह 22 पोलिस जखमी; बाहेरुन येणाऱ्या लोकांवर बंदी, वाचा संपूर्ण प्रकरण
Up Sambhal Jama Masjid Survey Violence : उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरुन रविवारी उसळलेल्या हिंसाचारात 4 तरुणांचा मृत्यू झाला. तसेच या हिंसाचारात सीओ अनुज चौधरी आणि एसपींचे पीआरओ यांच्या पायाला गोळी लागली. एसपींसह इतर 22 पोलीस जखमी झालेले आहेत.
RCC New
दुसरीकडे पोलिसांनी हिंसाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे. तसेच सुमारे 500 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंसाचारानंतर संभल तहसीलमध्ये 24 तास इंटरनेट बंद करण्यात आले होते. नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आज बंद राहणार आहेत.
आरोपींवर कडक कारवाईचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, डीएम राजेंद्र पानसिया यांनी संभल जिल्ह्यात 1 डिसेंबरपर्यंत बाहेरील लोकांना प्रवेश बंदी घातली आहे. संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण आहे. एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, आरोपींवर गँगस्टर कारवाई केली जाईल.
दुसरीकडे पोलिसांच्या गोळीबारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, आयुक्त म्हणाले- पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू नाही. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Sakhi
पाहणीदरम्यान हिंसाचार उसळला
रविवारी सकाळी 6.30 वाजता डीएम-एसपीसह एक टीम जामा मशिदीच्या पाहणीसाठी पोहोचली होती. टीमला पाहून मुस्लिम समाजातील लोक संतापले. काही वेळातच सुमारे दोन ते तीन हजार लोक जामा मशिदीबाहेर पोहोचले. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता जमावातील काही लोकांनी दगडफेक केली.
यानंतर हिंसक वातावरण निर्माण झाले. छतावरूनही दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना पळावे लागले. गोंधळ इतका वाढला की पोलिसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि नंतर लाठीचार्ज करून जमावाला पांगवले आहे.