मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश

पुण्याच्या बैठकीत झाले मनसेच्या पराभवाचे चिंतन; स्वत:ला फटका बसल्याने सगळे एकत्र आले

On
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश

Maharashtra Assembly Election : 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पराभूत उमदेवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.

RCC New

RCC New

निवडणुकीत कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरले यावरही बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली. तसेच ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या. या सर्व घडामोडींवर राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यातील मनसेचे पराभूत झालेले 82 उमेदवार तसेच त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांकडे विचारणा करण्यात आली. यावेळी उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.

मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या गावात एकही मत न मिळाल्याचे म्हटले आहे. हडपसर मतदारसंघात मतमोजणीमध्ये मनसेच्या उमेदवाराला 1000 मते जास्त मिळाली. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 600 मते जास्त मिळाल्याचे सांगण्यात आले. पोस्टल मतमोजणीवेळी महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज दिसत होता. मात्र, ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी झाल्यानंतर सगळे निकाल वेगळे लागायला लागले. अशा अनेक शंका मनसेच्या उमेदवारांनी या बैठकीत सांगितल्या.

Sakhi

स्वत:ला फटका बसल्याने सगळे एकत्र आले

सर्व पराभूत उमेदवारांचे म्हणणे राज ठाकरे यांनी ऐकून घेतले. घरातील लोकांचे मत देखील मिळाले नसल्याचा दावा उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर केला. दरम्यान, 2014 पासून राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात बोलायला सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळी कोणताही पक्ष सोबत आला नाही. यंदाच्या निवडणुकीत त्यांना फटका बसल्याने सगळे एकत्र आले आहेत. ईव्हीएमविरोधात जसे पुरावे मिळतील, त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

Advertisement

Latest News

महाराष्ट्रावर सद्या किती कोटींच कर्ज, लाडक्या बहि‍णींना रु.2100 सुरू झाल्यावर सरकारवर दरमहा बोजा किती? महाराष्ट्रावर सद्या किती कोटींच कर्ज, लाडक्या बहि‍णींना रु.2100 सुरू झाल्यावर सरकारवर दरमहा बोजा किती?
Mahayuti Government Challange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यात महायुतीला दणदणीत विजय मिळाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव...
आनंदाची बातमी : 'माझे पसंतीचे सिडकोचे घर'यासाठी महामंडळाने 2 अटी केल्या शिथील! 
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, खलनायकाला घरी बसवले
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
मविआनंतर मनसेलाही EVM वर संशय; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले पुरावे गोळा करण्याचे निर्देश
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला राहिला, कोणत्या पक्षाने किती उभे केले अन् किती जिंकले?