बांगलादेशात इस्कॉनच्या महंतांना अटक; भारत सरकारने युनूस सरकारला फटकारलं
हिंदूंवरील अत्याचारावरून चिंता व्यक्त; महंतांना खोट्या गुन्ह्याखाली न अडकवण्याची ताकीद
नवी दिल्ली : बांगलादेशातील सनातन जागरण मंचचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास यांना अटक आणि जामीन नाकारल्याबद्दल भारत सरकारने मंगळवारी चिंता व्यक्त केली. एका अधिकृत निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तर खोट्या गुन्ह्यात अडकवू नका, अशी ताकीद देखील युनूस सरकारला दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या मालिकेदरम्यान ही घटना घडली आहे, ज्यात जाळपोळ, लूटमार, चोरी, तोडफोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना यांचा समावेश आहे.
RCC New
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला बांगलादेशी हिंदू महंत चिन्मय कृष्णा दास याचा जामीन अर्ज चितगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांनी दास यांच्या कोठडीची विनंती केली नसल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. अटकेदरम्यान त्याला सर्व धार्मिक सवलती देण्यात याव्यात, असे निर्देशही न्यायालयाने केले आहेत.
सोमवारी दास यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करत भारत सरकार म्हणाले की, आम्ही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची खात्री करून घेण्याचे आवाहन करतो, ज्यात शांततापूर्ण संमेलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे.ल
श्री चिन्मय कृष्ण दास यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगून मंदिर प्रशासनाने त्यांच्या अधिकाऱ्यावर लिहिले की, इस्कॉनचा जगात कुठेही दहशतवादाशी काहीही संबंध आहे असे निराधार आरोप करणे आमच्या संघटनेशी अपमान करण्यासारखी ही घटना आहे.
Sakhi
पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्कॉन भारत सरकारला विनंती करते की त्यांनी त्वरित कारवाई करावी आणि बांगलादेश सरकारशी बोलून त्यांना कळवावे की आम्ही एक शांततापूर्ण भक्ती आंदोलक आहोत. बांगलादेश सरकारने चिन्मय कृष्ण दासची तात्काळ सुटका करावी. आम्ही प्रार्थना करतो, असे म्हटले होते.