नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी
म्हणाले- तुझा आज मर्डर नक्की होणार...!; जशास तसे उत्तर दिले जाईल-छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
Nandgaon VidhanSabha : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. कांदे आणि भुजबळ हे दोघेही आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. तर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना जीवे मारहण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स आहे, अशी धमकीच त्यांनी दिली.
RCC New
नेमका काय वाद झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला.नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला.
कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आले.
तर आम्ही तयार आहोत..!
छगन भुजबळ म्हणाले की, दोन्ही उमेदवार समोर आले हा मुद्दा नाही. कांदे यांच्या संबंधित व्यक्तीची शाळा आहे. तिथे हजार लोक आणून ठेवले होते. सचिन मानकर हिस्ट्री शुटर तिथे पिस्तूल घेऊन आला. तुला मारून टाकेल, असे समीरला बोलला, असा आरोप त्यांनी केलाय.
पोलिसांनी त्याला गाडीत बसवले आणि नंतर सोडून दिले. पोलीस असे वागत असतील तर कसे चालेल? मी एसपींना सांगितले आहे की, तुम्ही असे कराल तर तिथे खून पडतील. याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असेल, अशा रीतीने दादागिरी चालू असेल तर आम्हीही तयार आहोत, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला.