मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 

पोलिसांनी घेतले ताब्यात; भाजपशी वाद घालणे पडले महागात, वाचा सविस्तर नेमकं प्रकरण काय? 

On
मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 

मुंबई :  राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. त्यानुसार, राज्यभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे राज्यात एकूण अंदाजे 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे.

बीडसह काही जिल्ह्यातील वादाच्या घटना वगळता राज्यात शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. दुसरीकडे आता ऐरोली विधानसभा मतदारसंघात स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार आणि भाजप भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.

RCC New

RCC New

विशेष म्हणजे याप्रकरणी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अंकूश कदम यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. 

नेमका वाद काय, वाचा सविस्तर! 

कोपरखैरणे येथे भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंकूश कदम यांच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अंकुश कदम यांच्यासह 30 ते 35 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने येथील मतदारसंघात वातावरण तणावाचं बनलं आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होत असून भाजप महायुतीकडून गणेश नाईक हे उमेदवार आहेत. 

तर, शिवसेना ठाकरे गटाकडून एम.के.मढवी यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. विजय चौगुले हे अपक्ष उमेदवार असून परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीमधील स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम हे आहेत. मात्र, येथील मतदारसंघात राडा झाल्यानंतर अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यासोबत झालेल्या मारहाणीतून हा गुन्हा दाखल झाला आहे.  

मतदारसंघाचा इतिहास
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 मध्ये संदीप गणेश नाईक यांना जनतेने विजयी केलं होतं. दोन्ही वेळा संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. संदीप नाईक यांनी शिवसेना उमेदवार विजय चौघुले यांचा पराभव केला होता. पण, 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 

Tags:

Advertisement

Latest News

मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल  मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 
मुंबई :  राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. त्यानुसार, राज्यभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय? 
मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान
अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सोलापुरात मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला दे धक्का; आघाडी धर्म तुटला! 
नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी 
संगीतकार AR रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट का झाला?