पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या कामं करणार 

अजित पवारांचा फलटणच्या सभेत दावा; म्हणाले- बाकी येथे कुणाचाच घास नाही

On
पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या कामं करणार 

सातारा  : पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यावर हाच पठ्ठ्या कामं करणार, बाकी कुणाचाच घास नाही असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं. आपलं नाण खणखणीत आहे, अजून आपण 10 वर्षे काम करू शकतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

फलटणमध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. बारामतीमधील एका सभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. राज्यसभेची अजून दीड वर्षे आहेत. तुम्ही या आधी 14 वेळा निवडून दिलं आहे. आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी समोर आली पाहिजे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. या विधानाचा धागा पकडत अजित पवारांनी असे विधान करताच सभास्थळी एकच हाश्या पिकला. 

अजित पवार म्हणाले, "परवा बारामतीमध्ये भाषण करताना साहेबांनी सांगितलं की माझी मुदत संपल्यावर मी बाजूला होणार. ते राजकारणापासून दूर राहिले तर कामं कोण करणार? हाच पठ्ठ्या कामं करणार. दुसऱ्याचा घास नाही. तिथं आपलं नाणं खणखणीत आहे. मी अजून 10 वर्षे काम करणार."  बैल म्हातारा झाला, आता त्यांना बाजार दाखवा असं काही जणांनी या आधी म्हटलं होतं. मला त्या खोलात जायचं नाही असंही अजित पवार म्हणाले. 

बारामतीचा आमदार होणं सोपं नाही

अजित पवार म्हणाले की, "फलटणचे नेते म्हणतात की, आम्हाला फलटणचा बारामती करायचा आहे. पण बारामती करणं एवढं सोपं नाही. बारामतीचा आमदार पहाटे 5 वाजता उठतो आणि पावणे सहा वाजता कामाला लागतो. तिकडचे रस्ते, इमारती या क्लालिटीचे असतात. क्वालिटीचे काम झालं नाही तर त्याला ब्लॅक लिस्ट केलं जातं. इथे कसलं काम चालतंय ते माहिती नाही. ते श्रीमंतांना विचारावं लागेल."

साताऱ्याच्या बदल्यात माढा मागितला होता

साताऱ्याच्या बदल्यात माढा लोकसभेची जागा भाजपकडे मागितल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. अमितभाईंना भेटून मी सांगितलं होतं की सातारा सोडतो, तुम्ही मला माढा द्या. पण त्या ठिकाणी रणजित निंबाळकर आहेत असं अमितभाईंनी सांगितलं. माढ्याचं तिकीट लगेच जाहीर केलं असं अजित पवार म्हणाले. 

माझ्या दिल्लीमध्ये ओळखी आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला करून देणार. केंद्राचा पैसा हा मोठे प्रकल्प होण्यासाठी आणावाच लागतो. त्यासाठी सत्ता हवीय असं अजित पवार म्हणाले.


 

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप