प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांच्या खांद्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी : विनोद खटके
वंचितचा बूथ कार्यकर्ता मेळावा व मुख्य प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळा उत्साहात
लातूर / प्रतिनिधी : लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद खटके यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि बूथ कार्यकर्ता मेळावा शहरातील ६० फुटीरोडवरील गोजमगुंडे लॉन्स येथे मंगळवार (दि.५) रोजी सकाळी ११ वा. उत्साहात पार पडला.
या समारोहासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे स्टार प्रचारक ॲड. सर्वजित बनसोडे, स्टार प्रचारक तय्यब जफर हे उपस्थित होते तर या समारोहासाठी मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, महिला शहराध्यक्ष सुजाताताई अजनीकर, जिल्हा महासचिव ॲड.रोहित सोमवंशी, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल बनसोडे, युवा शहराध्यक्ष महेंद्र बनसोडे, युवा महासचिव नितीन गायकवाड, सुफी सय्यदसह वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.
मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन स्टार प्रचारक ॲड.सर्वजीत बनसोडे आणि स्टार प्रचारक तय्यब जफर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येक मतदाराला बूथपर्यंत आणून त्यांच्याकडून मतदान करून घेण्याची महत्वपूर्ण जबाबदारी प्रत्येक बूथ कार्यकर्त्याची आहे. बूथवरील प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या विजयामध्ये त्याचा सिंहाचा वाटा असतो.
त्यासाठी बूथवरील कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करावी लागेल आणि तुम्ही ती मेहनत करणारच आहेत. बुथ वरील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपले काम चोख करावे असे आवाहन सर्वजित दादा बनसोडे यांनी केले. विनोद खटके यांनी बोलताना बूथ कार्यकर्त्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे सांगितले. या बूथ मेळाव्याला प्रत्येक बुध वरील बूथ प्रमुख आणि त्यांचे सहकारी, बूथनिरीक्षक उपस्थित होते.
लातुरात वंचितला जनाधार
लातुरात विनोद खटके हे वंचितचे नंबर एकचे नेते आहे. लातुरात जनाधार असलेले ते नेते आहेत. त्यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो. लातूर शहर मतदारसंघात विनोद खटके यांचा तगडा जनसंपर्क आहे. काँग्रेसला शह देऊन वंचितला घवघवीत यश मिळवून देईल, असा अन्य नेता लातूर शहरात सध्या तरी नाही. त्यामुळे यंदा काँग्रेसची अडचण होणार असल्याचे बोलले जात आहे.