उद्धव ठाकरेंच्या बॅग चेकिंगवर निवडणूक आयोगाचा खुलासा; म्हणाले- हा SOP चा भाग

काल यवतमाळ अन् आज लातूर जिल्ह्यात केली बॅगांची तपासणी; ठाकरेंचा पुन्हा संतप्त सवाल 

On
उद्धव ठाकरेंच्या बॅग चेकिंगवर निवडणूक आयोगाचा खुलासा; म्हणाले- हा SOP चा भाग

Election Commission on Uddhav Thackeray bag checking controversy :  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची विमानतळावर चेकिंग करण्यात आल्याने ठाकरे चांगलेच संतापले, तर मोदी-शहांची देखील तपासणी करता का, असा सवाल त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवर उपस्थित केला. त्यावर आता निवडणूक आयोगाच्या वतीने पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची मंगळवारी (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्याचा हा सलग दुसरा दिवस होता, अशा परिस्थितीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचेही वक्तव्य आले आहे. ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील सामानाचे वारंवार चेकिंग केल्याने गेहलोत यांनी भाजपवर आरोप केला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले निवडणूक आयोग? 

दरम्यान, वाढता वाद पाहता निवडणूक आयोगाने निवेदन दिले. सूत्रांचा हवाला देत निवडणूक आयोगाने आपल्या ताज्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की उद्धव ठाकरे यांची बॅग प्रमाणित कार्यपद्धतीनुसार तपासण्यात आली आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, ECI मतदान पॅनेलने म्हटले आहे की बॅग तपासणे ही विमानतळावर एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) आहे, ज्याचे पालन केले गेले आहे. 
 
यवतमाळ  अन् आज लातूरात तपासणी 

यवतमाळमध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली. निवडणूक प्रचारासाठी ते या आठवड्यात सोमवारी येथे पोहोचले होते. त्यानंतर लातूरमध्ये पुन्हा त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. अशा स्थितीत निवडणूक अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या बॅगांचाही देखील तपासणी करणार आहेत की नाही, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित आहे. 

'मी माझी जबाबदारी पार पाडीन'

बॅग चेकिंगसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे खिसे आणि व आयकार्ड तपासा असा आदेश ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तर आपण निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराज नसल्याचे ठाकरे म्हणाले. मात्र, "तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत आहात आणि मी माझी जबाबदारी पार पाडेन. तुम्ही ज्या पद्धतीने माझी बॅग तपासली, त्याप्रमाणे तुम्ही मोदी आणि शहा यांच्या बॅगा तपासणार का?, असा सवाल देखील  त्यांनी उपस्थित केला. 

Tags:

Advertisement

Latest News

मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..! मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी...
उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर
भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी