शिंदे सेनेचा शिलेदार प्रचाराला गेला महिलेने लावले हाकलून

कोळी महिलेचा राग अनावर सदा सरवणंकराणा पाठवले माघारी

On
शिंदे सेनेचा शिलेदार प्रचाराला गेला महिलेने लावले हाकलून

सदा सरवणरकर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी माहीम मतदारसंघ पिंजून काढत आहेत नुकतेच ते कार्यकर्त्यांसह माहीम कोळीवाड्यात प्रचारासाठी गेले असता, त्यांना एका महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले. सदा सरवणकर घरासमोर येताच त्या महिलेचा राग अनावर झाला.

तिने सरवणकरांवर प्रश्नांचा भडिमार करत आपला रोष व्यक्त केला. तसेच सदा सरवणकर यांना घरातही येऊ दिले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सदा सरवणकर प्रचारासाठी घरासमोर आल्यानंतर कोळी महिलेने माहीममधील कोळीवाडा येथील फिश फूड स्टॉल हटवल्यामुळे सदा सरवणकरांना जाब विचारला. सदा सरवणकरांनी लाडकी बहीण म्हणत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोळीवाड्यातील महिला चांगलीच संतापल्याचे दिसून आले. त्या महिलेने सदा सरवणकरांना घरातही येऊ दिले नाही. त्यामुळे सदा सरवणकरांना माघारी फिरावे लागले.

नेमके काय घडले?
सदा सरवणकर प्रचारासाठी माहिममधील कोळीवाड्यात गेले होते. यावेळी ते एका कोळी महिलेशी संवाद साधण्यासाठी गेले असता त्या कोळी महिलेने आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला हे आधी सांगा. कधी चालू करणार? तुमच्या हातापाया पडून झाले. आमच्या पोटावर आले आहे. लाडकी बहीण सांगता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा? असा प्रश्नांचा भडिमार सदा सरवणकरांवर केला. त्यावर आपण घरात बसून चर्चा करुया, असे सदा सरवणकर म्हणाले. मात्र, त्या महिलेने सदा सरवणकरांना घरात घेतले नाही.

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप