झारखंडप्रमाणे महाराष्ट्रात मविआचा सुफडासाफ होईल; केंद्रीय मंत्री अमित शहांचा हल्लाबोल

सांगलीत बोलताना म्हणाले- शरद पवारांसारख्या चार पिढ्या आली तरी 370 कलम लागू होणार नाही 

On
झारखंडप्रमाणे महाराष्ट्रात मविआचा सुफडासाफ होईल; केंद्रीय मंत्री अमित शहांचा हल्लाबोल

सांगली :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे. शुक्रवारी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा पार पडत आहेत. नुकतीच सांगली जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली.

यावेळी अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हरियाणासारखाच सुपडासाफ होईल. तर शरद पवार यांच्या 4 पिढ्या झाल्या तरी कलम 370 पुन्हा लागू होणार नाही, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. 

अमित शहा यांची शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्यासाठी प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी शिराळ्यातील भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठे स्मारक बांधण्याची घोषणा करत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. 

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? 

अमित शहा म्हणाले की, शरद पवार नेहमीच शेतकऱ्यांचा कैवार घेतात. पण त्यांनी सत्तेत असताना त्यांच्यासाठी काय केले? त्यांनी आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्राला काय दिले? हे सांगावे. याऊलट मोदींनी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देण्याचे काम केले. त्यांनी अवघ्या देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी उघडी केली.

महाराष्ट्रातील जनतेची देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणण्याची इच्छा आहे. देवेंद्र व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली. आता त्यांचे सरकार महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 पर्यंत वाढवणार आहे. येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात निवडणूक होणार असून, मतदारांनी या प्रकरणी निर्णायक भूमिका घ्यायची आहे, असे ते म्हणाले.

राम मंदिरावरून मविआवर निशाणा 

अमित शहा म्हणाले, काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा तब्बल 75 वर्षे भिजत ठेवला. पण मोदींनी अवघ्या 5 वर्षांतच हे मंदिर उभे करून दाखवले. हे मंदिर तयार झाले तेव्हा शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी प्रभु रामचंद्रांच्या दर्शनाला जाणार होते. पण ते अजून अयोध्येला गेले नाहीत. आता हे लोक जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शरद पवार यांच्या 4 पिढ्या आल्या तरी हे शक्य होणार नाही. 

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले तर उद्धव ठाकरे आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवतील. शरद पवार आपल्या मुलीला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, काँग्रेसचे डझनभर लोक या पदासाठी कपडे शिवून तयार आहेत. पण भाजपमध्ये असे काहीही होत नाही. आता महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीला मतदान करा व फडणवीस यांना विजयी करा, असे अमित शहा म्हणाले. शहा यांच्या या विधानामुळे महायुतीचे सरकार आले तर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे नालासोपारा विरारमध्ये पैसे वाटप करताना सापडल्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. थेट भाजपचा बडा नेता...
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी 
महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार थांबला; 20 रोजी मतदान, 23 रोजी निकाल
राहुल गांधी यांच्या प्रेसला भाजपचे प्रत्युत्तर; जनतेची दिशाभूल करण्याचा राहुल गांधींवर आरोप