पाकिमधील रेल्वेस्टेशनवर बॉम्बस्फोट; 24 जण ठार; घटनेचा थरारक VIDEO आला समोर
काही क्षणात रेल्वेस्थानकावर होत्याचे नव्हते झाले; पाहा- थरारक VIDEO
Pakistan Balochistan Railway Station Blast Video : पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 हून अधिक जखमी आहेत.
पाकिस्तानी न्यूज वेबसाइट ट्रिब्यून एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, हा स्फोट जाफर एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच घडला. दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. काही क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे.
क्वेटाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रेन सकाळी 9 वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. स्फोट झाला त्यावेळी प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते. त्यांनी सांगितले की, स्फोटाच्या वेळी प्लॅटफॉर्मवर जवळपास 100 लोक होते.
स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात हा आत्मघाती स्फोट असल्याचे दिसते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.
पाकिस्तान के क्वेटा रेलवे स्टेशन पर ब्लास्ट का
— ANIL (@AnilYadavmedia1) November 9, 2024
CCTV फुटेज,
ये सब अपने लोगों पर ही ब्लास्ट कैसे कर लेते हैं, pic.twitter.com/qg4ZNyjS4A
बीएलएने पाकिस्तानमध्ये असे अनेक हल्ले केले
नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्येही मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 5 शाळकरी मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार हा स्फोट रिमोटच्या मदतीने करण्यात आला. याआधी ऑक्टोबरमध्ये बलुचिस्तानच्या दुक्की जिल्ह्यातील एका छोट्या खाजगी कोळसा खाणीत हल्लेखोरांनी २० कामगारांची हत्या केली होती. याआधी ऑगस्टमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) फुटीरतावादी आणि आत्मघाती हल्लेखोरांनी पोलीस स्टेशन, रेल्वे लाईन आणि अनेक महामार्गांवर हल्ले केले होते. यामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला.