गौतम गंभीरकडून मुख्य प्रशिक्षकपदाची कमान काढली  जाणार?, कोणाला संधी! 

टीम इंडियाची कामगिरी ठरणार कारणीभूत, गंभीरवर आता 'करो या मरो' स्थिती 

On
गौतम गंभीरकडून मुख्य प्रशिक्षकपदाची कमान काढली  जाणार?, कोणाला संधी! 

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून अतिशय महत्त्वाची व धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाची मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या गौतम गंभीर यांना हेड कोच पदावरुन हटवण्यात येणार असल्याची चर्चा सद्या सुरू झालेली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर याने जेव्हापासून हेड कोचची जबाबदारी घेतली. तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ज्यामध्ये काही निराशाजनक कामगिरी आणि रेकॉर्ड देखील मोडले गेले आहेत. रोहित शर्माच्या संघाने 27 वर्षांनंतर प्रथम श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली आणि त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व कारणांमुळे आता गौतम गंभीर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी राहिलेली नाही. घरच्या मैदानावरच किवीजविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे भारताला प्रथमच घरच्या मैदानावर मालिका क्लीन स्वीप करण्यास भाग पाडले. प्रत्येकाला गौतम गंभीरने टीम इंडियासोबत यशस्वी कारकिर्दीची अपेक्षा केली होती. परंतु, प्रत्यक्षात वेगळाच अनुभव पाहायला मिळत आहे. भारताचा माजी सलामीवीर आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी प्रचंड दबावाखाली असल्याचे देखील सांगितले जात आहे. 

या सगळ्यामध्ये गंभीरला 'करो या मरो' च्या स्थितीचा सामना करावा लागत आहे, असा दावा जागरणच्या एका अहवालातून  समोर आला आहे. जर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत चांगली कामगिरी केली नाही. तर प्रशिक्षक पदावरुन गौतम गंभीरला पायउतार केले जाणार आहे. 

व्हीव्हीएस लक्ष्मणला मिळू शकते संधी 

व्हीव्हीएस लक्ष्मणला कसोटीची कमान मिळू शकते. जर भारताचा ऑस्ट्रेलियात चांगला निकाल न मिळाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विद्यमान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना कसोटीची जबाबदारी स्वीकारण्यास सांगू शकतात, असाही दावा केला जात आहे. 

BCCI ने घेतली गंभीर-शर्माची बैठक 
शुक्रवारी, BCCI ने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत न्यूझीलंडविरुद्ध 0-3 च्या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाबाबत सहा तासांची बैठक घेतली. गंभीर आणि भारतीय थिंक टँकमध्ये काही निर्णयांबाबत मतभेद असल्याचे वृत्त आहे.


  

Tags:

Advertisement

Latest News

मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..! मतदानाला जाताना 'या' गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा, नाही तर तुम्हाला होईल त्रास..!
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्रात उद्या अर्थात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाची यासाठी...
उद्या 288 जागांसाठी मतदान; किती उमेदवार, मतदार किती, वाचा एका क्लिकवर सविस्तर
भाजपचा खेळ खल्लास, बड्या नेत्यांनीच तावडेंचा गेम केला; संजय राऊतांचा हल्लाबोल
विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले- हा भाजपचा नोट जिहाद आहे का?
राडा विरारमध्ये अन् कांड डहाणूत; विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप
अनिल देशमुख हल्ला प्रकरण; 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपासकार्य वेगात 
दमाच्या आजाराने त्रस्त, थंडीत होतो मोठा त्रास; जाणून घ्या- काय काळजी घ्यावी