राज्य सरकारचा मोठा निर्णय! 26 जानेवारी ची सुट्टी होणार रद्द!

शासनाने का घेतला असा निर्णय, कोणी केली होती मागणी, वाचा संपूर्ण बातमी

On
राज्य सरकारचा मोठा निर्णय! 26 जानेवारी ची सुट्टी होणार रद्द!

या नवीन वर्षात राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच 26 जानेवारी दिवशी शालेय विद्यार्थ्यांना झेंडावंदनानंतर सुट्टी दिली जाते. 26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते. सकाळी शाळेत झेंडा वंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. परंतु इथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Sakhi

"26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल," असे परिपत्रकातनमूद केलं आहे.

या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत, असं पत्रकात म्हटलं आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना या निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेली देशभक्ती वाढीस लागण्यास मदतच होईल. 

Tags:

Advertisement

Latest News

महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स ! महाकुंभ मेळा- 2025 मध्ये सहभागी होणार लॉरेन पॉवेल-जॉब्स !
MahaKumbh Mela-2025 : येत्या 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाला सुरुवात होत आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती...
केवळ 99 रुपयांत पाहता येणार सोनू सूदचा चित्रपट 'फतेह' !
चहाचे कागदी कप आता होणार हद्दपार! आरोग्यास घातक असल्याने घेतला निर्णय!
HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला झाली लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
'हा' आयुर्वेदिक चहा ठेवेल आपल्याला अनेक आजारांपासून दूर!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्री. घृष्णेश्वराच्या भक्तीत लीन!
ऑस्कर-2025 च्या यादीत 'हे' 5 भारतीय सिनेमे दाखल, वाचा संपूर्ण यादी!