वाहतूक नियमांमध्ये 1 जानेवारीपासून झाले मोठे बदल, जाणून घ्या नवीन नियमांविषयी
नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे.ज्यामध्ये एक म्हणजे वाहतूक नियमांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कोणत्याही वाहनचालकाने नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला फक्त मोठा दंडच नाही तर तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
काय आहे नवीन वाहतूक नियम,पाहा:-
जे वाहतूक नियम बदललेले आहेत ते आपत्कालीन वाहनांशी संबंधित आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे आता आपत्कालीन वाहनाला रस्ता न दिल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड आणि 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आपत्कालीन वाहनांना मार्ग देता यावा यासाठी सरकारने हा नियम केला आहे.
जर कोणाला आपत्कालीन वाहनांना रस्ता न देण्याची सवय असेल तर ही सवय त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. यासाठी त्यांना केवळ मोठा दंडच नाही तर तुरुंगात जावे लागू शकते. आपल्या देशात रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना आपत्कालीन वाहन म्हणून पाहिले जाते. परंतु काही लोक आपत्कालीन वाहनांना रस्ता देत नाहीत. हॉर्न आणि सायरन वाजवूनही लोक आपत्कालीन वाहनांना रस्ता देण्यास टाळाटाळ करतात.
Sakhi
रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लवकरात लवकर मार्ग मिळावा आणि गंभीर जखमी किंवा आजारी व्यक्तींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सरकारने हा नियम केला आहे.
अशा परिस्थितीत, जेव्हा आपत्कालीन वाहनाचा हॉर्न वाजतो तेव्हा विलंब न करता त्यांना रस्ता द्यावा हेच योग्य ठरेल. म्हणूनच, जर कोणीही 1 जानेवारीपासून निष्काळजीपणे वागेल तर त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. वाहतूक नियमांचे पालन करणे ही आपली नैतिक जिम्मेदारी आहे, ती योग्य ती प्रकारे पार पाडलीच पाहिजे.