मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान

लातूर जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत किती झाले मतदान, दिवसभरात काय काय घड़लं

On
मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झाले असून, त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63%, तर मुंबई सिटी विभागात 49.07% मतदान झाले. मतमोजणी 23 तारखेला होईल. तर मतदानाची फायनल आकडेवारी रात्री उशीरापर्यंत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येईल. 

लातूर जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत ६१.४३% मतदान

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- ६४.७५
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ – ५८.२७
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ – ६०.२७
उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ – ६२.४३
निलंगा विधानसभा मतदारसंघ – ६१.७५
औसा विधानसभा मतदारसंघ – ६१.८२

मुख्यमंत्री शिंदेंकडून आचारसंहितेचे उल्लंघन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चांदिवली विधानसभा मतदारसंघाला भेट दिल्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी साकीनाका पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

दिवसभरात नेमकं काय घडलं, वाचा थोड्क्यात अपडेट्स...! 

  • महाराष्ट्रातील नोट फोर व्होट प्रकरणातील आरोपीला गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
  • काँग्रेस नेते श्रीनिवास बी व्ही यांनी शिर्डीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे.
  • धुळ्यातील रहिवासी असलेल्या तरुणींनी शिर्डीत मतदान केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
  • धुळ्यातील एका मतदान केंद्रावर भाजप आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे.
  • अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे.
  • भाजपने बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे व काँग्रेस नेते नाना पटोले यांचे नाव घेतले.
  • भाजपने या दोन्ही नेत्यांवर निवडणूक मतदान प्रभावित करण्यासाठी परकीय चलनाचा वापर केल्याचा आरोप केला आहे.
  • अभिनेता सलमान खान यांनी चोख बंदोबस्तात मुंबईत मतदान केले. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने धमकी दिल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.   

Advertisement

Latest News

मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल  मतदान संपताच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल 
मुंबई :  राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रकिया पार पडली. त्यानुसार, राज्यभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सर्व एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायुतीला कौल, ठाकरे-शिंदेंचे काय? 
मतदानाची  वेळ संपली; राज्यभरात 5 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान
अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सोलापुरात मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाला दे धक्का; आघाडी धर्म तुटला! 
नांदगाव विधानसभा मतदारसंघात राडा, शिवसेनेच्या आमदारांनी दिली समीर भुजबळांना धमकी 
संगीतकार AR रहमान आणि सायरा बानो यांचा घटस्फोट का झाला?